Dilip Joshi Fake Call: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) ही मालिका गेली चौदा वर्षे सलग प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार हे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्यातील सर्वाधिक लोकप्रिय ठरले ते अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi). दिलीप जोशी यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द ही खूप मोठी आहे त्यांच्या अभिनयाचे सगळेच चाहते आहेत. त्यांनी फार कमी कालावधीमध्ये आपली लोकप्रियता कायमच टिकून ठेवली आहे. परंतु मध्यंतरी सोशल मीडियावर एक वेगळीच बातमी फिरायला लागली होती त्यात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Jethalal) या लोकप्रिय मालिकेतील कलाकार दिलीप जोशी यांच्या घराबाहेर 25 गुंड उभे आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्र आहेत ज्यात बंदुका, बॉम्ब असा हत्यांरांचा समावेश आहे खोडक्यात त्यांच्या जीवाला धोका आहे. (actor dilip joshi express his anger towords the fake news of gunmen standing outside his home read what is said)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बातमीनं सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना घाम फुटला होता. सध्या सोशल मीडियावर अनेक तऱ्हेच्या बातम्या या पसरत असतात त्याचे सेलिब्रेटी हे अनेकदा शिकार होत असतात. मध्यंतरी वीणा कपूर (Veena Kapoor Fake Death News) या ज्येष्ठ टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दलही अशी खोटी माहिती पसरवली होती ज्याचा फटकाही त्यांना सहन करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी माध्यमांना याबद्दल स्पष्टीकरणही दिलं होतं. आपल्याच मुलानं त्यांची हत्या केल्याची बातमी समोर आली होती. त्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कलाकारांना अशा बातम्याचा फटाकाही सहन करावा लागतो आहे. 


दिलीप जोशी यांनी याबाबत संतापN (Dilip Joshi Angry) व्यक्त केला आहे. त्यांच्याबाबतही अशीच एक माहिती पसरवली होती जी पुर्णत: खोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या घराबाहेर कोणी माणसं हत्यारं घेऊन उभी नव्हती असे त्यांनी स्पष्ट करत या बातमीवर पडदा टाकला आहे. 


नक्की काय म्हणाले दिलीप जोशी? 


आपल्या घराबाहेर अशी माणसं उभी आहेत, अशी बातमी दिलीप जोशी यांना कळताच त्यांचा संताप अनावर झाला आहे, ही बातमी खोटी आहे. असं काहीच झालं नाही. मला कळत नाही की या अफा कुठून आणि कशा पसरतात? गेल्या दोन दिवसांपासून ही अफवा पसरवली गेली आहे असे मला कळते आणि ही बातमी ऐकून मी चकीत झालोय. ज्याने ही चुकीची बातमी पसरवली आहे, त्याचं भलं होऊ दे. माझ्याबद्दल विचारण्यासाठी मला खूप लोकांचे फोन आले. खूप साऱ्या जुन्या मित्रांचे आणि नातेवाईकांचेही फोन आले, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 


त्यांचे भले होवो, दिलीप जोशी यांचा मोठेपणा


आपल्याबद्दलची इतकी मोठी बातमी व्हायरल झाल्यानंतरही दिलीप जोशी यांनी मोठेपणा दाखवला आहे आणि त्यांनी यावेळी म्हटलं आहे की,ज्यानं ही चुकीची बातमी पसरवली आहे, त्याचे भले होऊ दे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


हेही वाचा - Holi 2023 Organic Colors: घरच्या घरी सहज-सोप्या पद्धतीनं तयार करा धुळवडीसाठी नैसर्गिक रंग


काय होतं प्रकरण? 


अभिनेते दिलीप जोशी यांच्या नावाचा उल्लेख करत एका अज्ञात व्यक्तीनं नागपूर कंट्रोलमधून फोन आला आणि त्या व्यक्तीनं दिलीप जोशी यांच्या शिवाजी पार्क येथील घराबाहेर 25 लोकं हत्यारं घेऊन आहेत असा धमकीवजा फोन कॉल आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या बातमीवरून शिवाजी पार्क पोलिसांना (Nagpur News) अलर्ट देण्यात आले होते.