मुंबई : आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी पत्नींनी पतीवर शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता शारीरिक शोषणाचे आरोप पाकिस्तानी अभिनेता फिरोझ खान होत आहेत. ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पहिल्या पत्नीने आरोप केल्यानंतर फिरोझ खान सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. फिरोझ खानची पहिली पत्नी अलिजे सुल्तानने फिरोझ खानवर गंभीर आरोप केले आहेत. अलीजेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिरोझवर पहिली पत्नी अलिजेने लावले गंभीर आरोप
पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानची पहिली पत्नी अलिजे सुलतानने बुधवारी अभिनेत्यावर शारीरिक हिंसाचाराचा आरोप करत त्याच्यापासून विभक्त झाल्याची माहिती दिली आहे. . 



शारीरिक हिंचाराचे आरोप केल्यानंतर आलिजेला तिचं लग्न पूर्णपणे संपवायचं आहे. अलिजे म्हणते,  'आमचे चार वर्षांचे वैवाहिक जीवन पूर्णपणे शेवटच्या टप्प्यात आले आहे. या काळात सततच्या शारीरिक आणि मानसिक हिंसेशिवाय मला फसवणूक, ब्लॅकमेल आणि अपमान सहन करावा लागला.


अलिजे पुढे म्हणते, 'पूर्ण विचार करुन विभक्त होण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. मी माझं आयुष्य या भयानक मार्गाने घालवू शकत नाही. माझ्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून हा निर्णय मी घेत आहे.' 



पहिल्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांवर अभिनेत्याची प्रतिक्रिया
फिरोज खानबद्दल अशी माहिती समोर आल्यानंतर चाहते देखील आभिनेत्याचा विरोध करत आहेत. यावर फिरोज म्हणतो, मला पाकिस्तानच्या कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. 3 सप्टेंबर 2022 रोजी अलिजेसोबत त्यांचा घटस्फोट निश्चित झाला होता, त्यानंतर त्यांनी कौटुंबिक कायदा न्यायालयात मुलांचा ताबा आणि त्यांना भेटण्याचा अधिकार मिळावा यासाठी खटला दाखल केला.