Indian Idol 13 : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा  (Govinda) गेल्या काही वर्षात चित्रपटांपासून दूर गेलेला दिसत आहे. पण तो कोणत्या ना कोणत्या रिअॅलिटी शोमध्ये दिसतो. यादरम्यान तो मौजमजा करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच गोविंदा इंडियन आयडॉल सीझन 13 (Indian Idol 13) च्या दिवाळी स्पेशल (Diwali 2022)  एपिसोडमध्ये दिसला. पत्नी सुनीता (Sunita Ahuja) आणि मुलीसह गोविंदा इंडियन आयडॉल स्टेजवर पोहोचला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोविंदा पहिल्यांदाच पत्नीसोबत स्टेजवर डान्स (Govinda Dance) करताना दिसला. त्यावेळी दोघेही रोमँटिक झाले. या कार्यक्रमाची गुरुवारी यूट्यूबवर (YouTube) एक नवीन क्लिप शेअर केली. व्हिडीओमध्ये गोविंदा आणि पत्नी सुनीता टाळ्या वाजवताना आणि परफॉर्मन्सचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यावेळी पत्नीच्या मागणीवरून गोविंदाने स्टेजवर डान्स करत आग लावली. 


आणखी वाचा - 'मला वाटलं माझं आयुष्य संपलं', कतरिना कैफचा धक्कादायक खुलासा


गोविंदाचा डान्स पाहून त्याचे चाहते पुन्हा घायाळ झाले आहेत. वाढत्या वयानंतर देखील गोविंदाच्या डान्सचा अंदाज बदलेला नाही. त्यामुळे अनेकजण गोविंदाच्या डान्सचं कौतूक करत आहेत. डान्स करत असताना गोविंदा आणि सुनिता (Govinda dance With Sunita Ahuja) रोमँटिक झाले. डान्सच्या शेवटी गोविंदाने बायकोला शेजारी घेऊन तिची मिठी मारली आणि तिचा किस घेतला. त्यावेळी त्याची मुलगी लाजल्याचं पहायला मिळालं.


पाहा व्हिडीओ - 



दरम्यान, हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. अनेकांनी गोविंदाच्या डान्सचं कौतूक केलंय. जजेस आणि ऑडियन्सने देखील टाळ्यांच्या गडगडाटीत दोघांना चिअर्स केलंय. गोविंदा नेहमी लिजेंड होता आणि लिजेंड राहणार, असं एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे.