मुंबई : अभिनेता हृतिक रोशन यांची बहीण सुनैना रोशन हिने जबरदस्त मेकओव्हर केला आहे. सुनैनाने आपल्या बदल केल्याचा फोटो हृतिकने गुरूवारी ट्विटरवर पोस्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात हृतिकने दोन फोटो एकत्र पोस्ट केले आहे. त्यात जुना फोटो आणि सध्याचा फोटो एकत्र आहेत. जुन्या फोटोत जाडुबाई जोरात असलेली सुनैना, सध्याच्या फोटोत स्लीम आणि ट्रीम दिसत आहे.


तिने काळ्या कलरचा ड्रेस परिधान केला आहे तर मोत्याचा नेकलेस घातला आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा खूपच सुंदर दिसत आहे. 


 



हृतिकने आपल्या बहिणीला टॅक करताना लिहीले की, मी याला बदल म्हणतो. मला तुमच्यावर गर्व आहे दिदी. सुनैना रोशन... कायम पुढे जात राहा... काहीही अशक्य नाही आहे. 


कंगना राणावतने दिलेल्या मुलाखतीनंतर हृतिकबाबत सर्वकाही वाईट घडत होतं. पण आता ही बातमी त्याला थोडा का होईना आनंद देणारी आहे.