Saba Azad gets Trolled: सबा आझाद आणि हृतिक रोशन एकमेकांना डेट करत आहेत ही बातमी सध्या सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. आधी करण जोहरच्या पार्टीमध्ये आणि मग लंडनला एकत्र ते दोघं स्पॉट झाले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (actor hritik roshan girlfriend saba azad spotted netizen trolls her for her childish look)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो पाहून मात्र नेटकऱ्यांनी सबा आणि हृतिक जबरदस्त ट्रोल केलं आहे. हृतिकनं आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्यानंतर कंगना राणावतसोबत तो रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर त्यांचे ब्रेकअपही खूप गाजले होते. माध्यमांमध्ये हृतिक आणि कंगना एकमेकांसमोर न येता एकमेकांविषयीची पोलखोल केली होती. त्यानंतर कंगना आणि हृतिकच्या अफेअरच्या चर्चा कमी झाल्या होत्या. 


परंतु आता बॉलीवूडमध्ये कमबॅक केल्यानंतर हृतिकच्या लव्ह लाईफच्या चर्चा होत आहेत. आता हृतिक सबा आझादला डेट करतो आहे. त्यांच्या चाहत्यांना त्यांची जोडी आवडत असली तरी त्यांच्या विरूद्ध ट्रोलर्स मात्र जोरात ट्रोलिंग करत आहेत. अनेकदा दोघेही हात हातात घेऊन खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण यावेळी जेव्हा दोघे एकत्र दिसले तेव्हा लोकांना ही जोडी फारशी आवडली नाही आणि त्यांनी अशा कमेंट्स केल्या ज्या आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकत्याच आलेल्या व्हिडीओनुसार हृतिकसमोर सबा आझाद अक्षरक्षः लहान मुलगी वाटते आहे. 


हृतिक रोशन सबा आझादसोबत मुंबईत दिसला होता जिथे फोटोग्राफर्सनी या दोघेचे फोटो काढले जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दोघांनी हसत हसत फोटोग्राफर्सना पोज दिल्या. पण ट्रोलर्सनी मात्र या दोघांना खूप ट्रोल केले. ही जोडी फारशी एकमेकांनी सूट होत नाहीये असं अनेकांचे मतं होतं. त्याचबरोबर हृतिकपेक्षा सबा आझाद फार लहान वाटत असून ती त्याची मुलगी वाटतेय अशी कमेंटही अनेकांनी केली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचीही बातमी आहे. हृतिक आपल्या कुटुंबासोबत अनेकदा सबाला डिनरला किंवा फिरायला घेऊनही जातो अशीही माहिती आहे. परंतु अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल काहीच स्पष्टता नाही.