कॉमेडीचे बादशाह जॉनी लिव्हर यांचे किस्से आणि कॉमिक टायमिंग
जॉनी प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने लोकांना खळखळून हसवतात
मुंबई : कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा ख्रिश्चन कुटुंबात 14 ऑगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशमध्ये जन्म झाला. जॉनी लिव्हरचं पूर्ण नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे. हिंदी सिनेमात असे अनेक कलाकार आहेत जे प्रेक्षकांना आपल्या कॉमेडीने हसवतात, पण प्रत्येकजण जॉनीच्या कॉमिक टायमिंगवर फिदा आहे. जॉनी प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने लोकांना खळखळून हसवतात
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जॉन प्रकाश राव जनुमालाला जॉनी लिव्हर असं नाव देण्यात का आलं. जॉनीने त्याच्या वडिलांसोबत मुंबईच्या हिंदुस्तान लीव्हर कंपनीत काम केलं आहे, यावेळी ते आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या कॉमिक आर्ट टॅलेंटने हसवायचे.
यानंतर जॉन प्रकाश राव जनुमाला हळूहळू इतर कारखान्यातील लोक आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकप्रिय झाले आणि यानंतर त्यांना जॉनी लिव्हर हे नाव पडलं.
सुनील दत्त यांनी जॉनी लिव्हरला पहिला ब्रेक दिला. एका शो दरम्यान बॉलिवूड अभिनेते सुनील दत्त यांनी जॉनीची प्रतिभा ओळखली आणि त्याला 'डर का रिश्ता' मध्ये काम करण्याची संधी दिली. यानंतर फिल्म इंडस्ट्रीने जॉनी लिव्हरला खूप डोक्यावर घेतलं.
चमकदार चित्रपट कारकीर्दीसोबत जॉनीचं वैयक्तिक जीवनही खूप चांगलं आहे. जॉनीची मुलगी जेमी जॉनी लिव्हर ही देखील एक प्रसिद्ध कॉमेडियन आहे. तिच्या कॉमिक टाइमिंगचंही खूप कौतुक केलं जातं.
चित्रपटांमध्ये लोकांना हसवणारे जॉनी लिव्हर खऱ्या आयुष्यात खूप शिस्तबद्ध वडील आहेत, जे शिस्तीला खूप महत्त्व देतात. एका मुलाखतीदरम्यान जॉनी लिव्हरच्या मुलीने म्हटलं होतं की, 'कधीकधी जोक्स मला समजंत नाहीत.
ते योग्य प्रकारे करताही येत नसल्यामुळे वडिलांनी अनेकवेळा माझा अपमान केला आहे. त्यांना सगळं परफेक्ट लागतं'. जॉनी लीव्हरने 1984 मध्ये सुजाताशी लग्न केलं. या दोघांना दोन मुलं आहेत.