shirtless scence नको रे बाबा! कोणत्याही चित्रपटाआधी महेश बाबू का ठेवतो ही अट?
काय असेल यामागचं कारण?
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट जगतामध्ये अभिनेता महेशबाबू हा यशशिखरावरव पोहोचला आहे. कलेच्या बळावर या अभिनेत्यानं त्याच्या प्रसिद्धीचा डोलारा उभा केला. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली. चित्रपट साकारताना ज्याप्रमाणे दिग्दर्शकांच्याही कलाकारांकडून काही अपेक्षा असतात, त्याचप्रमाणे महेशबाबूही त्याच्या अटीशर्तींवरच चित्रपटांमध्ये काम करतो.
2014 पासून या अभिनेत्यानं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत चित्रपटात शर्टलेस सीन न देण्याचं ठरवलं. कोरोना काळानंतर प्रदर्शित झालेल्या 'सरकारू वारी पाटा' या त्याच्या चित्रपटाने बरीच कमाई केली, आताही तो आगामी चित्रपटांच्या कामांमध्ये व्यग्र आहे. (Actor Mahesh Babu Avoids shirtless scene for major reason)
महेशबाबूचे चित्रपट गाजतात ते त्याच्या अभिनयाच्या बळावर. हा अभिनेता चित्रपटांमध्ये शर्टलेस फार कमीच दिसतो किंबहुना दिसतच नाही. यामागेही एक महत्त्वाचं कारण आहे.
जिथं सलमान, शाहरुख आणि अगदी आमिरही त्यांच्या शर्टलेस सीनसाठी ओळखले जातात तिथेच महेशबाबू मात्र त्याविरुद्धच पावलं उचलताना दिसतो. महेशबाबू आपल्या शरीराचा वापर कोणत्याही व्यावसायिक प्रसिद्धीसाठी होऊ नये अशा विचारांचा आहे.
फिटनेस फ्रिक महेशबाबू त्याच्या देहयष्टीवर बरंच लक्ष देताना दिसतो. पण, मोठया पडद्यावर मात्र तो सहसा शर्टलेस येताना दिसत नाही.
2014 मध्ये दिसलेला महेशबाबूचा शर्टलेस लूक
असं नाही की, हा अभिनेता कधीच शर्टलेस लूकमध्ये दिसला नाही. 2014 मध्ये तो 'नेनोक्कादीन' (Nenokkadine) या चित्रपटातून शर्टलेस लूकमध्ये समोर आला होता. यावेळी त्यानं भल्याभल्या बॉलिवूडकरांनाही मागे टाकलं होतं. पण, त्यानंतर मात्र त्यानं Shirtless सीन देणं प्रकर्षानं टाळलं.