मुंबई : काळीवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोन रात्र जेलमध्ये काढल्यानंतर त्याला अखेर जामीन मंजूर झाला. त्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी आणि बॉलिवूडकरांनी एकच जल्लोष केला. त्यावर बॉलिवूडचा भरभक्कम पाठींबा आहे, हे आपण जाणतोच. पण मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी सक्रीय असलेल्या महेश मांजरेकरांनी याबद्दलचे आपले मत नोंदवले. 


महेश मांजरेकर म्हणाले की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआयशी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, सलमान एक असा व्यक्ती आहे की जो आरोप स्वतःवर घेण्यास तयार असतो. शेवटपर्यंत त्याच्यातील माणूसकी संपत नाही. कोण चूक नाही करत? मी पण नक्कीच चूका करतो. पण सलमानच्या चूका फुगवून त्यावर चर्चा केली जाते.


पुढे ते म्हणाले की, सलमान माझ्यासाठी एका मित्रापेक्षा अधिक आहे. दोन दिवसांपासून माझी पत्नी मला विचारत आहे की, सलमानचे काय होईल ? मी तिला फक्त इतकेच सांगत होतो की, तो लवकरच सुटेल. 


सलमान महेश जवळचे मित्र


महेश मांजरेकर हे सलमान खानचे जवळचे मित्र आहेत. त्याचबरोबर त्यांनी दबंग, वॉटेन्ड, दबंग, रेडी आणि जय हो यांसारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमानने काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरव्यात आले होते. सुमारे २० वर्षांनंतर या प्रकरणावरील उडदा उठला आणि सलमानला ५ वर्षांची तुंरुंगवासाची शिक्षा झाली. मात्र या प्रकरणात अडकलेल्या सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता झाली.