Mithun chakraborty Hospitalized Video : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची प्रकृती खालावल्याने शनिवारी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती सुधारल्याचं समोर आलंय. मात्र, त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणात ठेवल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं. अशातच आता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हेल्थ अपडेट (Health update) दिली आहे. त्याचबरोबर सध्या त्यांचा रुग्णालयातील व्हिडीओ देखील समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथून चक्रवर्तींची प्रकृती कशी?


मिथुन चक्रवर्ती आता पूर्णपणे बरे झाले आहेत, एमआरआय सोबतच त्याच्या अनेक वैद्यकीय चाचण्याही रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. त्यांनी आज हलका आहार घेतला असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. डिस्चार्ज करण्यापूर्वी त्यांना काही चाचण्या कराव्या लागतील, त्यानंतर ते घरी जाऊ शकतील, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


मिथुन चक्रवर्ती यांना छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर शूटिंगदरम्यान थकवा आणि शरीरात पाणी कमी झाल्यामुळे मिथुनची तब्येत बिघडली होती अशी माहिती देखील समोर आली होती. त्यामुळे त्यांचे चाहते देखील चिंतेत होते. मात्र, डॉक्टरांच्या रिपोर्टनंतर आता त्यांची प्रकृती सुधारल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.


पाहा Video



रविवारी पश्चिम बंगाल भाजप प्रमुख सुकांत मजुमदार यांनी मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली अन् प्रकृतीची विचारपूस केली. उद्या मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, डॉक्टरांनी त्यांना उद्यानंतर एक-दोन दिवस घरी आराम करण्यास सांगितले आहे, असं सुकांत मजुमदार यांनी सांगितलंय.


दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्काराची घोषणा झाल्यावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला होता. मात्र, एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.