मुंबई : अभिनेता नरेंद्र झा यांचं वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झालंय. बुधवारी सकाळी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचे प्राण घेतले. यापूर्वीही दोन वेळा त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या फार्महाऊसवर सुट्ट्या मजेत घालवण्यासाठी गेले होते... इथेच सकाळी ५.०० वाजल्याच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला... आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. 


विशाल भारद्वाज निर्मित सिनेमा 'हैदर'मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. ऋतिक रोशनसोबत ते काबिल सिनेमात दिसले होते... तर शाहरुखच्या रईसमध्येही त्यांनी भूमिका बजावली होती. याशिवाय अभिनेता प्रभाससोबत ते 'साहो' या सिनेमात काम करत होते. 


नरेंद्र झा यांनी अनेक टीव्ही सीरियल्समध्येही काम केलंय. मुळचे बिहारचे असलेल्या नरेंद्र यांनी आपल्या करिअरची सुरुवात दूरदर्शनवरच्या 'शांति' या कार्यक्रमातून केली होती. त्यानंतर ते अनेक कार्यक्रमांत दिसले. नरेंद्र यांनी हिंदीशिवाय तमिळ, तेलुगु भाषांमध्येही काम केलंय.