Adbhut trailer : अभिनेता नवाज़ुद्दीन सिद्दीकीचा अलीकडेच ओटीटी फ्लॅटफॉर्मवर 28 जून रोजी 'रौतू का राज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता नवाज़ुद्दीन सिद्दीकी नवीन चित्रपट 'अद्भुत'मध्ये दिसणार आहे. त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात नवाज़ुद्दीन सिद्दीकीसोबत डायना पेंटी, श्रेया धनवंतरी आणि रोहन मेहरा हे देखील दिसणार आहेत. शब्बीर खान दिग्दर्शित 'अद्भुत' हा एक अलौकिक थ्रिलर चित्रपट आहे. शब्बीर खानने मुन्ना मायकल आणि हिरोपंती या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'अद्भुत'च्या ट्रेलरची सुरुवात एका जोडप्यापासून होते. श्रेया धनवंतरी आणि रोहन मेहरा एका अपार्टमेंटमध्ये जातात. जेव्हा विचित्र गोष्टी घडू लागतात तेव्हा दोघेही रोमँटिक मूडमध्ये असतात. ते अपार्टमेंटमध्ये आल्यानंतर सर्व काही बदलते. खूप विचित्र आणि भयानक गोष्टी घडत असतात. पण हे कोण करतंय? हे भूत आहे की मानव? याच्या तळाशी जाण्यासाठी आणि सत्य शोधण्यासाठी चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारणारा नवाज़ुद्दीन सिद्दीकी येतो. 


 'अद्भुत'च्या ट्रेलरमध्ये काय?


'अद्भुत'च्या ट्रेलरमधील संवाद हा दमदार असून त्याला भयपटाचा स्पर्शही आहे. एका क्षणी  नवाज़ुद्दीन रोहन मेहराला सांगतो की जर एखादी गोष्ट दिसत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की तिथे काहीही नाही. फक्त तिथे कमी प्रकाश आहे.  'अद्भुत'मध्ये नवाज़ुद्दीन सिद्दीकीची चौकशी जसजसी पुढे सरकते, तसतसे डायना पेंटीचे पात्र त्याच्या संशयाच्या भोवऱ्यात येते. पण तो खरोखर गुन्हेगार आहे का? या सर्व विचित्र गोष्टी करणारी ती आहे का? असा प्रश्न पडतो. 



'अद्भुत' 15 सप्टेंबरला सोनी मॅक्सवर रिलीज होणार 


अनेकदा चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटीवर प्रदर्शित होत असतात. मात्र, नवाज़ुद्दीन सिद्दीकीचा 'अद्भूत' हा थेट टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. हे 15 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता सोनी मॅक्स टीव्ही वाहिनीवर दाखवला जाणार आहे.