मुंबई : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक व्यक्तिमत्वांच्या जीवनावर  बायोपिक (Biopic) झाला आहे. बॉलिवूडसाठी बायोपिक हा काही नवा ट्रेंड नाही. काही महिन्यांपूर्वी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जीवनावर बायोपिक होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 'मै रहूं या ना रहूं, यह देश रहना चाहिए- अटल' असं या बायोपिकचं शीर्षक आहे.  मात्र अनेक दिवसांपासून या बायोपिकमध्ये वाजपेयींची भूमिका कोण करणार, याबाबत चाहत्यांना उत्सूकचा लागून राहिली होती. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. (actor pankaj tripathi will play  former prime minister atal bihari vajpayee role in biopic ravi Jadhav directed film)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बायोपिकमध्ये वाजपेयी यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास दाखवण्यात येणार आहे. हा बायोपिक लेखक एन पी उल्लेख (N P Ullekh) यांच्या 'द अनटोल्ड वाजपेयी अँड पॅराडॉक्स' (The Untold Vajpayee Politician and Paradox) या पुस्तकावर आधारित असणार आहे. 


पंकज त्रिपाठी अटलजींच्या भूमिकेत


मिळालेल्या माहितीनुसार, पंकज त्रिपाठी अटल वाजपेयी यांची ऑनस्क्रीन भूमिका साकारणार आहे. पंकज त्रिपाठी नुकत्याच रिलीज झालेल्या 'शेरदिल'मधून सिनेचाहत्यांच्या भेटीला आले होते.  उत्कर्ष नैथानी यांनी सिनेमाचं लेखन केलंय. तर मराठमोळे रवी जाधव दिग्दर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत. तर विनोद भानुशाली, संदीप सिंह, सॅम खान, कमलेश भानुशाली आणि विशाल गुरनानी हे निर्माते आहेत.


मी भाग्यवान : पंकज त्रिपाठी 


"अटलजींची भूमिका करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. अटलजींनी भारताच्या राजकारणावर आपली छाप सोडली. अटलजींच्या बोलण्याची शैली ही स्वकीयांसह विरोधकांनाही पटली. अटलजींचा  जनसंघाच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते होण्यापर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी आहे", अशी प्रतिक्रिया पंकज त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान हा बायोपिक 2023 मध्ये वाजपेयी यांच्या 99 व्या जंयतीच्या मूहुर्तावर म्हणजेच 25 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे.