माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर येणार चित्रपट, कोण साकारणार भूमिका?

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

Updated: Jun 28, 2022, 05:04 PM IST
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर येणार चित्रपट, कोण साकारणार भूमिका? title=

Atal Bihari Vajpayee Biopic: दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक बनवणारे निर्माते संदीप सिंग यांनी आता माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव 'अटल' असेल. नुकतंच या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग आणि विनोद भानुशाली  संयुक्तपणे  करणार आहेत. अटल या शीर्षकावरील पोस्टरवर माजी पंतप्रधानांच्या सुप्रसिद्ध ओळी लिहिल्या आहेत. "मैं रहूँ या ना रहूँ यह देश रहना चाहिए", या ओळी लिहिण्यात आल्या आहेत. 

हा चित्रपट अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर लिहिलेल्या 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटेनेस अँड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित असेल. या पुस्तकात माजी पंतप्रधानांचे बालपण, महाविद्यालयीन दिवस आणि राजकारणातील त्यांच्या प्रवेशाची कहाणी आहे. अमश फिल्म्सच्या झीशान अहमद आणि शिव शर्मा यांनी 2019 मध्ये चित्रपटाचे हक्क विकत घेतले होते. दोघेही या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.  शिव शर्मा आणि जीशान अहमद गेल्या तीन वर्षांपासून हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत होते. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर बरेच दिवस काम सुरू होते. या पुस्तकात वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वासह बरीच रंजक माहिती आहेत. यासोबतच राजकारणी आणि पंतप्रधान म्हणून त्यांचे काही रंजक अनुभवही नोंदवले आहेत.

हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे शूटिंग पुढील वर्षीच्या सुरुवातीला सुरू होईल. या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण साकारणार? याची घोषणा सध्या झालेली नाही. हा चित्रपट 2023 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची योजना आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस 25 डिसेंबरला आहे. 2023 हा वाजपेयींचा 99 वा वाढदिवस असेल.