मुंबई : 'कधीही हार मानू नका आणि अडचणींना तुमच्यावर स्वार होवू देवू नका.', 'जे कठोर मेहनत घेतात, देव त्यांचीच मदत करतो.' असे  एक ना अनेक उत्तम विचार जगाला दिलेल्या माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांची यशोगाथा आता रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. गेल्या वर्षापासून चित्रपटसृष्टीचा कल थोर व्यक्तींचे बायोपिक साकारण्याकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मेरी कॉम, एम.एस. धोनी यांच्या बायोपिक नंतर आता अब्दूल कलाम यांच्या बायोपिकची तयारी जोरदार सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर चित्रपटात अब्दूल कलाम यांच्या भूमिकेला अभिनेते परेश रावल न्याय देताना दिसणार आहे. खुद्द परेश रावल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून स्वत:चं वर्चस्व निर्माण केलं आहे. 



अब्दूल कलामांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज असलेले परेश रावल म्हणतात की, 'माझ्यामते कलाम हे संत होते. त्यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.' असं मत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले. 


तर, याआधी पंतप्रधान मोदींची भूमिका साकारण्यासाठी परेश रावल यांनी आपली इच्छा व्यक्त करून दाखवली होती. मात्र काही कारणांमुळे त्यांने ती साकारता आली नाही. पंतप्रधान मोदी यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने भूमिका साकारली. 


आता परेश रावर कलांमांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहे. नायक, खलनायक, सहकलाकार अशा सर्वच भूमिका उत्तम प्रकारे बजावल्यानंतर कलाम यांच्या बायोपिकमध्ये परेश रावल स्वतःची छाप कितपत पाडतात हे तर येणारा काळच ठरवेल.