मुंबई : दाक्षिणात्य आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटांच्या दुनियेत अभिनेता प्रभास हा कायमच चर्चेत असतो. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपासून ते अगदी तरुणींच्या मनावर राज्य करण्यापर्यंत प्रभासची सरशीच असते. अशा या अभिनेत्यानं चाहत्यांनाही कधीच निराश केलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभासनं (Prabhas) कृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानं असंच एक पाऊल उचलत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. हे सरप्राईज खास आहे, कारण प्रभासनं 'तिच्या'सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


बरं, आता ही ती कोण, असा प्रश्न तुम्हाला पडत असून, 'ती' म्हणजे विविध चेहरे तुमच्यासमोर उभे राहिले असतील तर थांबा. कारण, प्रभासनं त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबतचा नव्हे, तर त्याच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. 


शपथ तुला आहे.... एका वचनाखातर 41 वर्षे हेमा मालिनी यांनी नाही केलं 'ते' काम


 


पॅन इंडिया स्टारचा बिग कॅनव्हास, रोमँटिक ड्रामा 'राधे श्याम' (Radhe Shyam) पुढील वर्षी मकर संक्रांतीला प्रदर्शित होणार आहे. या उत्सुकतेत आणखी भर टाकत, बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पोस्टरने जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आज नव्या पोस्टरचे अनावरण केले. यामध्ये प्रभास एका सुंदर टक्सिडोमध्ये दिसत असून, पूजा हेगडेने एक अत्यंत आकर्षक बॉल गाऊन घातलेला दिसत आहे,. एखाद्या परिकथेतील चित्र असावं, त्याचप्रमाणे हे पोस्टर दिसत आहे.




राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित, ही एक बहुभाषिक प्रेमकथा 1970 मध्ये युरोपमध्ये घडत असल्याचं या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत झालेला, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सने सज्ज असा हा चित्रपट एका नव्या जोडीची केमिस्ट्री चाहत्यांच्या भेटीला आणत आहे. सध्या या चित्रपटासाठी प्रभाससोबत इतरही कलाकार बराच वेळ देत असून, आता या कलाकृतीचं भविष्य कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.