5000 कोटी फिक्स! 2025 ते 2028 पर्यंत बॉक्स ऑफिसवर प्रभास करणार राज्य
अभिनेता प्रभासने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवली आहे. एक-दोन नव्हे तर प्रभासचे सात मोठे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Prabhas Upcoming Movies: भारतीय अभिनेता प्रभासला 'बाहुबली' चित्रपटातून मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचा हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. यावर्षी प्रभास पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहेत. बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा प्रभासचा दबदबा पाहायला मिळणार आहे. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातून त्याने जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली होती. मात्र, प्रभासने आता पुढील काही वर्षांसाठी तयारी केली आहे. ज्यामुळे तो पुढील काही वर्षे बॉक्स ऑफिसवर राज्य करणार आहे.
प्रभासकडे एक-दोन नव्हे तर एकूण 7 चित्रपट आहेत. ज्यामधून तो पुढील चार-पाच वर्षे बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवणार आहे. ज्या चित्रपटांच्या अंतिम प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाहीये. परंतु आम्ही तुम्हाला प्रभासचा कोणता चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे सांगू शकतो.
प्रभासचे आगामी 7 चित्रपट
द राज साब 2025
फौजी 2025
स्पिरिट 2026
सालार 2- होम्बले फिल्म्स 2026
डायरेक्टर प्रशांत वर्मा यांचा चित्रपट- होम्बले फिल्म्स 2028
कल्कि 2898 एडी -2027 किंवा 2028
डायरेक्टर लोकेश कनगराज यांचा चित्रपट- होम्बले फिल्म 2028
प्रभासचे हे 7 चित्रपट तुम्ही पाहू शकता. 'सालार 2' चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा आणि लोकेश कनागराज यांचे हे तीन नवीन प्रकल्प आहेत. यासाठी प्रभासने होम्बले फिल्म्ससोबत करार केला आहे. या दोन्ही चित्रपटांचे नाव काय असेल हे अद्याप समोर आलेले नाहीये. परंतु फक्त दिग्दर्शकांची नावे अहवालातून समोर आलेली आहेत.
7 चित्रपट गाठणार 5 हजार कोटींचा आकडा
2025 मध्ये प्रभास बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे. प्रभासने 2025 ते 2028 पर्यंत पूर्ण तयारी केली आहे. त्याच्याकडे एकूण 7 चित्रपट आहेत. सोशल मीडियावर देखील प्रभासचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे हे चित्रपट कधीच वादात सापडले नाहीत. त्याचे हे 7 चित्रपट मिळून 5 हजार कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. प्रभासचा 'बाहुबली' हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता. त्यामुळे त्याला एका चित्रपटासाठी 700 कोटींची कमाई करणे अवघड नाहीये.