संपूर्ण भारत सध्या 23 ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत आहे. याचं कारण म्हणजे याच दिवशी दुपारी 5 वाजून 27 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. ISRO च्या या मोहिमेकडे फक्त भारतीय नाही, तर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. त्यातच रशियाचं Luna 2 अपयशी झाल्याने, भारताच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पण यादरम्यान अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयान 3 ची खिल्ली उडवल्याने नेटकरी नाराज झाले आहेत. प्रकाश राज यांनी भाजपावर टीका करताना चांद्रयान 3 ची खिल्ली उडवणं नेटकऱ्यांना रुचलेलं नाही. 


प्रकाश राज यांनी काय पोस्ट केलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश राज यांनी ट्विटरला चांद्रयान 3 ची खिल्ली उडवणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर एकच वाद सुरु झाला आहे. याचं कारण प्रकाश राज यांनी या पोस्टमध्ये इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचं कार्टून शेअर केलं आहे. या फोटोत के सिवन शर्ट आणि लुंगी घातलेले असून हातात चहा दिसत आहे. थोडक्यात, प्रकाश राज यांनी त्याला चहावाला दाखवलं आहे. 


हे कार्टून शेअर करताना प्रकाश राज यांनी चंद्रावरुन आलेले पहिले फोटो असा टोला लगावला आहे. 'विक्रम लँडरने चंद्रावरुन पाठवलेला पहिला फोटो,' असं प्रकाश राज यांनी लिहिलं आहे. 



यानंतर नेटकरी संतापले असून, प्रकाश राज यांना खडेबोल सुनावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील हा अंध द्वेष असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. प्रकाश राज यांनी याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असून, चहावाला अशा शब्दांत खिल्ली उडवली आहे. 


नेटकरी संतापले


प्रकाश राज यांनी पोस्ट शेअर करताच नेटकरी त्यावर व्यक्त होत असून, नाराजी जाहीर करत आहेत. अनेकांनी त्यांना वैज्ञानिकांचा अपमान केल्याने सुनावलं आहे. तसंच चांद्रयान हे भारताच्या अभिमानाचा भाग आहे. ते देशाचं असून, एखाद्या पक्षाचं नाही याची आठवणही काहींनी करुन दिली आहे. 




 




चांद्रयान 3 चं लँडिग लाईव्ह पाहण्याची संधी


ISRO ने ट्वीट करत हे लँडिग कुठे, कधी आणि कसं पाहता येईल याची माहिती दिली आहे. यासाठी तुम्हाला बंगळुरुच्या मिशन कंट्रोल सेंटरमध्ये (Mission Control Centre) जाण्याची गरज नाही. 


ISRO ची वेबसाइट -  https://www.isro.gov.in/
YouTube - https://www.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
Facebook - https://www.facebook.com/ISRO
किंवा डीडी नॅशनल टीव्हीवरही तुम्ही हे लाईव्ह पाहू शकता.