Prateik Babbar Movies: स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे. प्रतिक अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. अलीकडेच प्रतीकने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये प्रतीक एका विचित्र आउटफिटमध्ये दिसत आहे. अभिनेत्याचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक त्याची तुलना फॅशन आयकॉन उर्फी जावेदशी करत आहेत. (actor Prateik Babbar strange look viral trollers said Urfi javed brother four more shots nz)


हे ही वाचा - सनी लिओनचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; हॉट ड्रेस घालून किचनमध्येच... ​



प्रतिक बब्बरचे फोटोशूट व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता प्रतीक बब्बरने GQ मासिकासाठी त्याचे नवीनतम फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये तो राखाडी रंगाचा कोट आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहे. त्याचा कोट कंबरेच्या अगदी वर कापला गेला आहे आणि समोरची लांबी सामान्य कोट सारखी ठेवली आहे. यासोबतच अभिनेत्याने हातावर काळ्या रंगाचा नेलपेंट लावला आहे आणि केसही वेगळ्या स्टाईलमध्ये सेट केले आहेत.


हे ही वाचा - बिपाशा बसूच्या मुलीचा पहिल्यांदाच फोटो आला समोर, ठेवलंय 'हे' खास नाव



नेटिझन्सकडून उर्फी जावेदचा भाऊ ट्रोल


प्रतीक बब्बरच्या नव्या लूकने एकीकडे फॅशनिस्टा लोकांची भुरळ पाडली आहे. दुसरीकडे, अनेकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले आहे. प्रतीक बब्बरच्या नव्या लूकची उर्फी जावेदशी तुलना करण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्याचे लेटेस्ट फोटो पाहता तो उर्फी जावेदच्या भावासारखा दिसत असल्याचे बोलले जात आहे.


हे ही वाचा - ''मी उंच नाही, पण.. स्वतःच्या बॉडी पार्टबाबत अभिनेत्रीचं अतिशय बोल्ड वक्तव्य...


 




फॅशन चाहत्यांची पसंतीस उतरली नाही


प्रतीक बब्बर क्वचितच हेडलाइन्समध्ये दिसतो पण यावेळी त्याच्या लूकने सर्वांची लाइमलाइट लुटली आहे. प्रतिक बब्बर फोटोजने नुकतेच इंटरनेटवर त्याच्या नवीन लूकचे फोटो शेअर केले आहेत ज्यात तो स्टायलिश सूटमध्ये दिसत आहे पण त्याची फॅशन नेटिझन्सना फारशी आवडली नाही. त्याची तुलना अतरंगी कपडे घालणाऱ्या उर्फीसोबत केली जात आहे.