सनी लिओनचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; हॉट ड्रेस घालून किचनमध्येच...

तिचे दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ समोर येत असतात जे चाहत्यांच्या आवडतात. 

Updated: Nov 12, 2022, 08:13 PM IST
सनी लिओनचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; हॉट ड्रेस घालून किचनमध्येच...  title=
Sunny Leone Video Viral Wearing a hot dress in the kitchen nz

Sunny Leone Latest Video: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हीने परदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. तिचे अनेक चाहते आहेत. ती सोशल मीडियावर ही सक्रिय असते. तिचे दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ समोर येत असतात जे चाहत्यांच्या आवडतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही चाहत्यांना घाम फुटेल असे  व्हिडिओ असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही पाहिलात का व्हिडिओ...(Sunny Leone Video Viral Wearing a hot dress in the kitchen nz)

हे ही वाचा - स्किन केअर रूटीनमध्ये किचनमधील या गोष्टीचा समावेश ठरेल फायदेशीर!

सनी लिओनीचा बोल्ड लूक

या व्हिडिओत सनी बोल्ड स्टाईलमध्ये अतिशय शॉर्ट ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे यादरम्यान सनी लिओनी किचनमध्ये काहीतरी जेवण बनवताना  दिसत आहे. हाय हिल्स आणि शॉर्ट ड्रेसमध्ये सनी लिओनीचा हा व्हिडिओ आणि तिची स्टाइल चाहत्यांना खूप आवडत आहे. सोशल मीडिया यूजर्स तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

हे ही वाचा - सपना चौधरीचा सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ, डान्सचा 'हा' Video झाला व्हायरल

सनी लिओन बिग बॉसच्या घरात दिसणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता सनी लिओनी सलमानच्या शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये ती प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. वास्तविक, सनी तिच्या आगामी शो 'स्प्लिट्सविला'च्या नवीन सीझनमुळे सलमानच्या शोमध्ये प्रवेश करणार आहे, ज्यामध्ये अर्जुन देखील तिच्यासोबत दिसणार आहे. सनी तिच्या शोच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात येत असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा - चेहऱ्याची त्वचा काळी पडण्याची समस्या तुम्हाला असल्यास ताबडतोब जाणून घ्या

सनी लिओनी बिग बॉसची स्पर्धक 

सनी लिओनीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिच्या ग्लॅमरस शैलीने तिने चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडसोबतच सनी लिओनीने साऊथ इंडस्ट्रीतही आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. मात्र, ती 'बिग बॉस'ची स्पर्धक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आली. बिग बॉसमुळेच सनी लिओनीला ओळख मिळाली, त्यामुळेच ती आज या टप्प्यावर आहे. सीझन 5 मध्ये ती स्पर्धक म्हणून दिसली होती.