चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?
या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.
मुंबई : गेली बरीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या वाट्याला, एकाएकी त्याची आर्थिक परिस्थिती मुलाखतीमधून सर्वांसमोर आणावी लागते ही एक धक्कादायक बाब. बॉलिवूडमधील हा लोकप्रिय अभिनेता आहे, आर. माधवन. (R Madhavan )
अभिनयात नशीब आजमावणारा माधवन आता Rocketry: The Nambi Effect मधून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात हातखंड दाखवणार आहे. शिवाय यामध्ये तो मह्तत्वाच्या भूमिकेतही दिसेल. पण, या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.
लेकाच्या प्रशिक्षणामध्ये कोणताही अडथळा नको म्हणून या अभिनेत्यानं परदेशाची वाट धरली. लेकाला त्याचं ऑलिम्पिक विजयाचं स्वप्न साकार करता यावं यासाठी त्यानं हा निर्णय घेतला.
आर्थिकदृष्ट्या काही अडचणी असतानाही त्यानं त्या कुटुंबापर्यंत येऊ दिल्या नाहीत. एका मुलाखतीमध्ये त्यानं कोणाही समान्या व्यक्तीप्रमाणं प्रत्येक प्रोजेक्टपूर्वी आपल्या मनात एक प्रकारची भीती दडलेली असते असं सांगितलं.
'मला एक मुलगा आहे. मी कोविड काळात पैसे कमवलेच नव्हते. दोन वर्षांपूर्वीही मी पैसे कमवले नव्हते. मला एकाच गोष्टीकडून आशा होत्या ती म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली माझी वेब सीरिज. त्याव्यतिरिक्त मी कोणता चित्रपटच केला नव्हता. तसं पाहिलं तर, शेवटी मी Vikram Vedha हा चित्रपट साकारला होता त्यामुळं मला कायमच भीती असते', असं तो म्हणाला.
माधवननं दिलेली ही मुलाखत आणि त्यानं आयुष्यातील या अडचणी पाहता अडचणीच्या काळातही कशा प्रकारे त्यानं संयमाने गोष्टी निभावून नेल्या हेच स्पष्ट झालं.