मुंबई : लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड कलाकारांच्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घ्यायला लोकांना फार आवडत असल्याचं पहायला मिळतं. त्यामुळे लोकांना बॉलिवूड कलाकारांचे किस्से वाचायला फार आवडतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला त्या बॉलीवूड स्टारचा ईमोशनल किस्सा सांगणार आहोत, जो खरोखरच धक्कादायक आणि ईमोशनल आहे. हा किस्सा आहे अभिनेते राज किरण यांचा 'अर्थ' सारख्या अर्थपूर्ण चित्रपटात काम त्यांनी काम केलं आहे. ज्यांना घेवून बऱ्याच प्रकारच्या चर्चा झाल्या आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वर्षांपूर्वी या प्रकरणातील ऋषि कपूर यांचं विधान समोर आल्यावर राज यांची कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. ऋषि कपूर यांनी दावा केला होता की, ''राज अमेरिकेत टेक्सासमध्ये राहत होते, त्यांचं मानसिक संतुलन ठीक नव्हतं. त्यांच्या या स्थितीला त्यांचे कुटुंबिय जबाबदार असल्याचंही म्हटलं होतं''.


ऋषि कपूर यांनी त्यांच्या कुटुंबीयांवर हाही आरोप लावला की, ''त्यांनी राज यांना घरातून काढून टाकलं आणि त्यांनी राज यांची फसवणूक केली आहे. यामुळे तो डिप्रेशन मध्ये गेला''.


ऋषि कपूर यांचा दावा
राज आणि ऋषि कपूर यांनी 'कर्ज़' चित्रपटात एकत्र काम केलं आहे.  ऋषि कपूर यांनी माध्यमांसमोर म्हटलं होतं की, ''राज मानसिकदृष्ट्या ठीक नाही आहे आणि तो मेंटल हॉस्पिटलमध्ये राहत आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना सोडून दिलं आहे. तसंच,  ऋषि कपूर यांनी आश्वासन दिलं होतं की, ते राज यांना नक्कीच परत आणतील''.


परिवारचा पलटवार
जेव्हा ऋषि कपूर यांचं हे वक्तव्य माध्यमांसमोर आलं तेव्हा जगभरात खळबळ उडाली होती. जेव्हा एका मोठ्या स्टारने हे मिडिया समोर विधान मांडलं तेव्हा त्यांच्या फॅमिलीला मिडियासमोर यावं लागलं. राज यांची मुलगी ऋषीकाने माध्यमांना सांगितलं की, ''ऋषि कपूर यांचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे''.


राज यांची पत्नी रूपा आणि मुलगी ऋषिका म्हणाल्या की, ''राज बेपत्ता आहेत. राज गेली पाच वर्षांपूर्वीपासून बेपत्ता आहेत. आम्ही पोलिसांकडेही त्यांची तक्रार केली असून पोलिसां व्यतिरिक्त अनेक जासूस त्यांचा शोध घेत आहेत''.


राज किरण यांच्या मुलीने त्यावेळी सांगितलं होतं की, ''राज किरण डिप्रेशनमध्ये गेले होते''. असं म्हणतात की, त्यांच्यावर मानसिक उपचार सुरु होते मात्र एक दिवशी तिथून अचानक ते पळून गेले. यामागील एक कारण म्हणजे आर्थिक चणचण असू शकते


ज्येष्ठ अभिनेते राज किरण यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1949 रोजी मुंबईमध्ये झाला. अर्थसारख्या गंभीर आणि अर्थपूर्ण चित्रपटाशिवाय राज किरण यांनी आया रिश्ता, घर द्वार, ये कैसा इंसाफ, स्टार, घर हो तो आईसा, वारिस अशा जवळ-जवळ १०० चित्रपटांत काम केलं. एक नया रिश्ता या सिनेमांत त्यांनी रेखा यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती.