मुंबई : चर्चा तर होणारच! "जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी" या दमदार संवादाने सुरु होणाऱ्या टीझरने अक्षरशः कायापालट केला आहे. सोशल मीडियावर घोंगावणार हे सत्तेचं वादळ आता थंड होण्याचं चिन्ह दिसत नसून ते आणखीनंच वाढत आहे. हेच वादळ येत्या १२ जानेवारी २०२४ला 'खुर्ची' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घोंगावताना दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजवर 'खुर्ची' या चित्रपटाची सर्वत्र हवा असलेली पाहायला मिळत आहे. अशातच चित्रपटाच्या टीझरने अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. सत्ता, खुर्ची, खून, मारामाऱ्या आणि रक्त या सगळ्याच्या अवतीभोवती फिरणार कथानक नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवेल यांत शंका नाही. टीझरमधील कलाकारांच्या भेदक नजरा चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. टीझरमध्ये पाहायला मिळाल्याप्रमाणे नेमकं सत्तेच्या खुर्चीवर कोण बाजी मारणार हे चित्रपटगृहातच कळेल.


 या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे,आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. टीझरमध्ये राकेश बापट, अक्षय वाघमारे, व बालकलाकार आर्यन हगवणे या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने राडाच घातला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिनेता राकेश बापट चित्रपटाबाबत बोलताना, "नुकताच चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझर पाहून तुम्हाला कल्पना आली असेल की नक्की आम्ही काय व कशा प्रकारचा राडा घातला आहे. एकूणच चित्रपट करताना खूप मज्जा आली" असं तो म्हणाला. तर अभिनेता अक्षय वाघमारे चित्रपटाबाबत बोलताना, "चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची झालेली हवा पाहून मी अचंबित झालो आहे. टिझरलाही प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. चित्रपटात काम करताना प्रचंड मज्जा आली. धमाल, मस्ती करत ऍक्शन सीन शूट केले, एकूणच या चित्रपटात काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता" असं म्हणाला आहे.


संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत 'आराध्या मोशन फिल्म्स',’ आणि 'योग आशा फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. डॉ. अमित बैरागी आणि आतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. 


खुर्चीसाठीची लढाई नेमकं कोण लढणार? चित्रपटातील सत्तेसाठीच्या या लढाईत खुर्ची कोणाला मिळणार? हे पाहणं रंजक ठरणार.  'खुर्ची’ हा जबरदस्त ऍक्शनचा भरणा असलेला चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होईल. ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.