लग्नामध्ये वधूला रुखवत का दिला जातो? 99 टक्के लोकांना माहित नसेल कारण

Wedding Rituals : सध्या लग्नसमारंभांचा माहोल सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्तावर लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात, त्यांना काही विशेष महत्व सुद्धा असते. अनेक लग्नांमध्ये नवरी मुलीला रुखवत दिला जातो. लग्नाच्या ठिकाणी एका टेबलावर रुखवत सजवतात. मात्र त्याच नेमकं कारण काय हे जाणून घेऊयात.   

| Dec 02, 2024, 20:55 PM IST
1/7

लग्नातील रुखवत हा शब्द खरतर रुखसत आणि वतन या दोन शब्दांपासून बनलेला आहे. रुखसत म्हणजे विदाई, पाठवणी होणं, निरोप घेणं किंवा दूर जाणं.  तर वतन म्हणजे आपला देश प्रदेश आणि प्रांत. 

2/7

लग्न झाल्यावर मुलगी आपला प्रदेश प्रांत सोडून सासरी जाते. तेव्हा रुखसतच्या वेळी मुलीला आपल्या वतनातील म्हणजेच माहेरची आठवण म्हणून काही खास गोष्टी तिच्या सोबत पाठवल्या जातात. 

3/7

लग्नाच्या वेळी मुलीसोबत पाठवण्यात आलेल्या वस्तुंना रुखवत असे म्हणतात. पूर्वीच्या काली दळणवळणाची साधन फार कमी असल्याने अनेक महिने किंवा वर्ष सासरी गेलेल्या मुलीशी माहेरच्यांचा संपर्क होतं नसे.

4/7

अशावेळी मुलीला माहेरची आठवण जास्त येऊ नये म्हणून माहेरातील नातेवाईक तिला आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू, मिठाई आणि इतर अन्य सामग्री लग्नात मुलीला रुखवताच्या माध्यमातून भेट देत असतं.    

5/7

आपली आठवण मुलीला रहावी या उद्देशाने मुलीच्या मावश्या, आत्या, काकी, मैत्रिणी लग्नातील काही प्रतिकृती, पदार्थ, मिष्ठान्न स्वतःच्या हाताने तयार करून नवरी मुलीच्या रुखवतीत ठेवत असतं. 

6/7

ज्यामुळे या वस्तू पाहून मुलगी सासरी असताना संसारात तिचं मन रमायचं. आज आधुनिकतेमुळे जग बदललं असलं तरी आजही लग्नातील उत्साह आनंद म्हणून लग्नात मुलींसाठी रुखवत सजवली जाते आणि ती मुलीला भेट दिली जाते. 

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)