मुंबई : एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिस (RRR Box Office) वर धमाकेदार कामगिरी केली आहे. संपूर्ण देशभरात आणि परदेशातही या चित्रपटाचीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा एक असा चित्रपट ठरत आहे, ज्यानं ‘बजरंगी भाईजान’, ‘सीक्रेट सुपरस्टार’ आणि ‘पीके’ या गाजलेल्या चित्रपटांनाही मागं सोडलं आहे. 


दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणारं यश पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही थक्क झाले आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खानचाही समावेश आहे.  दरम्यान, अभिनेता राम चरण यानं ही लोकप्रिता आणि प्रसिद्धीचं गणित सोपं करुन सांगितलं. 


बॉलिवूड दिग्दर्शकांनी एकदातरी  (Pen India movie) संपूर्म देशासाठीचे चित्रपट साकारावेत ते दक्षिणेतही दाखवावेत असं तो म्हणाला. 


आपले चित्रपट दक्षिणेत चालत नाहीत, असं म्हणणाऱ्या सलमानलाही त्यानं उत्तर देत त्याच्या म्हणण्यात काहीत गैर नसल्याचं राम चरण यानं सांगितलं. 


सलमानच्या म्हणण्यावर उत्तर देताना आपले चित्रपट इथंच पाहिले जातील ही धारणा सोडून आपल्या मर्यादा ओलांडत विजयेंद्र (आरआरआर) आणि राजामौली यांच्यासारख्या स्क्रिप्ट लिहीत त्यावर विश्वास ठेवावा, असं राम चरण म्हणाला. 


मी नक्कीच एक भारतीय चित्रपट बनवू इच्छितो, ज्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांसोबत मी काम करु इच्छितो असंही राम चरण यानं यावेळी म्हटलं. 


हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी दक्षिणेकडील कलाकारांना पुढे आणत मोठे चित्रपट साकारावेत अशी इच्छा बोलून दाखवली.