भर स्टेजवर Ranbir Kapoor कडून Alia Bhatt चा अपमान, अखेर तिने असं स्वत:ला सावरलं
त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टचा अपमान केल्याचं दिसून आलं.
मुंबई : बॉलीवूडचे पॉवर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट ब्रह्मास्त्र पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. नुकताच ब्रह्मास्त्रचा मोशन पोस्टर लॉन्च कार्यक्रम पार पडला. यावेळी रणबीर कपूरने त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टचा अपमान केल्याचं दिसून आलं.
रणबीरने स्टेजवर आलियाची उडवली खिल्ली
स्टेजवर चित्रपटाचे प्रमोशन करताना रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मस्ती सुरू होती. यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर आलियाला तिला कसे वाटत आहे असे विचारतो. याला उत्तर देताना आलिया भट्ट म्हणाली- मी खूप भावूक आहे. हा एक रोमांचक आणि भावनिक क्षण आहे.
आलियाचे बोलणे ऐकून रणबीर कपूर गंमतीने म्हणाला – पण तू भावनिक का आहेस? तू अजून पोस्टरमध्ये दिसली नाहीस. रणबीरचे हे वाक्य ऐकून आलिया भट्ट चकित होते. तेव्हा आलिया उत्तर देते आणि म्हणते- कारण तू पोस्टरमध्ये आहेस, क्कीच मी भावूक होणार... आलिया-रणबीरच्या या धमाल विनोदाने उपस्थित लोकांचे खूप मनोरंजन केले.
रणबीर-आलियाचे लग्न कधी होणार?
या कार्यक्रमात रणबीर कपूरसोबतच्या तिच्या लग्नावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे रणबीर कपूरनेही क्षणाचाही विलंब न लावता आलिया भट्टला सर्वांसमोर जाब विचारला.
अभिनेता आलियाला म्हणाला- आपण लग्न कधी करणार? आलियाने लाजत उत्तर दिले की, तू मला हे का विचारत आहेस. त्यानंतर रणबीरने लगेच यू-टर्न घेतला आणि तो अयान मुखर्जीला विचारत असल्याचे सांगितले.
ब्रह्मास्त्र या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर अयान मुखर्जीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट तीन भागात बनवला जाणार आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये पहिला भाग येईल. या चित्रपटात रणबीर कपूर शिवाची भूमिका साकारत आहे. मोशन पोस्टरमध्ये रणबीर कपूरचा इंटेन्स लूक दिसला.