Ranveer Singh Video: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) कायमच आपल्या अतरंगी फॅशनमुळे ओळखला जातो. त्याचबरोबर आपल्या एनर्जीनं ते सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडतो. अभिनयात येण्यापुर्वी रणवीरच्या आज्जीनं त्याच्यासाठी एक इच्छा व्यक्त केली होती. नुकताच रणवीर सिंगला सन्मानिय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याप्रसंगी रणवीर आपल्या आज्जीच्या त्या इच्छेबद्दल खुलासा केला आहे. (actor ranveer singh reveals that her grandmother wished him to become like amitabh bachchan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासारखं बनणं हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असतं. त्यांच्या कामगिरीबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाच्या सगळ्यांनाच आकर्षण वाटतं. त्यांच्यासारखं नाव आणि प्रसिद्धी आपणंही मिळावावी आणि त्यांच्यासारखं यश आपल्यालाही यावं याबद्दल प्रत्येक अभिनेता हा जागरूक असतोच. याला रणवीर सिंगही अपवाद नाही. (Ranveer Singh and Amitabh Bachchan) 


हेही वाचा - 'मी सुंदर नाही पण...' बॉलीवूड पदार्पणावर जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य


नुकतीच बिग बींनी आपल्या वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत. याशिवाय वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्याचा 'गुड बाय' (Good Bye) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. यादरम्यान रणवीरनं अमिताभ बच्चन यांचे नावं घेतलं आणि या वयातही काम करणाऱ्या बिग बींसारखे व्हायचे आहे, असं तो म्हणाला. 


 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



लोकमत महाराष्ट्रीयन 2022 अवॉर्ड जिंकण्यासोबतच रणवीर सिंगनं प्रेक्षकांशी संवाद साधला. तो म्हणाला की, 'मला लहानपणापासून अमिताभ बच्चन यांच्यासारखं व्हायचं होतं, मला आजही त्यांच्यासारखे व्हायचं आहे आणि मला भविष्यातही त्यांच्यासारखे व्हायचं आहे. वयाच्या 80  व्या वर्षीही ते फक्त अभिनयात व्यस्त आहेत. मला त्यांच्यासारखे बनायचे आहे.'


हेही वाचा - करीना, कतरिनानंतर आता 'ही' मराठमोळी अभिनेत्री लपवत्येय Baby Bump? फोटो व्हायरल


'माझ्या हृदयाच्या अमिताभ बच्चन यांचेच फोटो आहेत. माझ्या आजीनेच मला अमिताभ बच्चन यांची ओळख करून दिली. अमिताभ बच्चनच्या चित्रपटांच्या व्हीएचएस पाहता पाहता ती मला खायला द्यायची. यासोबतच ती म्हणायची की एक दिवस तू मोठा होऊन अमिताभ बच्चन सारखा होशील.' अशी भावना रणवीरनं शेअर केली.