Bollywood Actor Ranvir Shorey Father Death: अभिनेता रणवीर शोरे (Ranvir Shorey) यांच्या वडीलांचे निधन झाले आहे. रणवीर शोरेनं आपल्या ट्विटरवरून शनिवारी सकाळी माहिती दिली. रणवीर शोरे वडील हे चित्रपट निर्माते होते. केडी शोरे (Ranvir Shorey Father Caddy Shorey) यांचे वयाच्या 92 व्या निधन झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांच्या निधनाबद्दल रणवीरनं त्यांच्या फोटो ट्विटवर पोस्ट केला आहे त्याचसोबत त्यांच्याबद्दल त्यानं काही इमोशन पोस्ट लिहिली आहे. बॉलीवूड स्टार्सनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना दिसत आहेत. रणवीरचे मित्र आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांनी तसेच चाहत्यांनी पोस्टवर शोक व्यक्त केला. 


टेलिव्हिजन निर्माते राज नायक, लेखक-दिग्दर्शक मिहीर फडणवीस अशा कलाकारांनीही रणवीरच्या वडिलांना श्रद्धाजंली वाहिली आहे. 


केडी शौरी हे खूप लोकप्रिय कलाकार होते. 1970 आणि 80 च्या दशकात 'जिंदा दिल' (Zinda Dil), 'बे-रेहम' (Bereham) आणि 'बदनाम' (Badnam) सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे ते एक चित्रपट निर्माता होते. याशिवाय त्यांनी 1988 मध्ये आलेल्या 'महा-युद्ध' (Maha Yudh) चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते, ज्यात गुलशन ग्रोवर, (Gulshan Grover) मुकेश खन्ना (Mukesh Khanna), कादर खान (Kabir Khan) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांनी भूमिका केल्या होत्या. तसेच त्यांनी या चित्रपटांमध्ये कॉमियो रोलही केला होता. 



बॉलिवूड अभिनेता रणवीर शोरेने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. त्याचा अभिनय लोकांना खूप आवडतो. तो एक उत्तम कलाकार आहे. अलीकडेच त्याने एक चित्रपट देखील केला ज्याचे खूप कौतुक झाले. इरफान खानच्या इंग्रजी मिडियम या चित्रपटातून तो दिसला होता. रणवीर शोरेनं अभिनेत्री कोंकना सेन शर्मा (Ranvir Shorey and Konkana Sen Sharma) हिच्यासोबत विवाह केला होता पण लवकरच त्यांच्या घटस्फोटही झाला.