मी आयुष्यात कधी तुमच्यासह काम करणार नाही, अभिनेत्याने धर्मेंद्र यांच्या तोंडावर सांगितलं, पण अखेर त्याला...
Dharmendra : धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेत्यानं त्यांच्या तोंडावर दिला होता नकार, थेट सांगितलं यापुढे तुझ्यासोबत काम करणार नाही. त्यानंतर अभिनेत्यावर आली अशी वेळ...
Dharmendra : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा लवकरच रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर बॉबीची भूमिका काय असेल असा प्रश्न अनेकांना पडलाल आहे. इतकंच नाही तर त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. देओल कुटुंबात बॉबी आणि त्याचे वडील धर्मेंद्र हे दोघं एकमेकांच्या खूप जवळ आहेत. धर्मेंद्र हे एक अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्यासोबत काम करण्याची सगळ्यांना इच्छा होती. पण एक अभिनेता होता ज्यानं सांगितलं की त्याला धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. त्याविषयी बॉबीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.
बॉबी देओलनं त्या कलाकाराचं नाव न घेता सांगितले की धर्मेंद्र यांच्या तोंडावर त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. पण धर्मेंद्र यांनी त्यावर कोणतंही उत्तर दिलं नाही. अनेक वर्षांनंतर त्या कलाकारानं धर्मेंद्र यांच्यासोबत एका चित्रपटात काम केले. याविषयी बोलताना बॉबी म्हणाला की धर्मेंद्र यांना या गोष्टीची तक्रार नव्हती की ज्या कलाकारानं त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता, तो त्यांच्यासोबतच चित्रपट करत आहे.
बॉबीनं ही मुलाखत iDiva ला दिली होती. यावेळी बॉबी म्हणाला माझ्या वडिलांसोबत असं झालं होतं की 'त्यांचा एक सह-कलाकार, मी त्यांचं नाव घेणार नाही, अनेक वर्षांपूर्वी त्यांना म्हणाला की मी तुझ्यासोबत कधीच काम करणार नाही. तर माझे वडील म्हणाले जे करायचं आहे ते कर. आणि वेळ ही बदलत राहते. त्याच कलाकारासोबत काम करण्याची ऑफर मिळाली होती. त्यानं माझ्या वडिलांना काय सांगितलं होतं हे त्याच्या लक्षात होतं आणि त्याला चिंता वाटत होती की माझे वडील त्याच्यासोबत काम करणार नाही. माझे वडील म्हणाले मी कधीच असा विचार केला नाही, ही तुझी इच्छा होती, माझी नाही. मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल.'
हेही वाचा : माझ्यासारखं वागलासं तर चपलने मारतील; 'तेरे नाम'चा उल्लेख करत सलमान खाननं दिला सल्ला
या शिवाय धर्मेंद्र नुकतंच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये दिसले होते. चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी बोलताना बॉबी म्हणाला, 'मला वाटतं की जी भूमिका त्यांनी साकारली आहे, तशी भूमिका दुसरं कोणी साकारू शकत नव्हतं. मला असं वाटतं की जर कोणत्या दुसऱ्या अभिनेत्यानं ती भूमिका साकारली असती तर त्याच्यात ती जादू राहिली नसती. मला वाटतं की माझं वडील हे अप्रतिम आणि इमानदार अभिनेता आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. हेच कारण आहे की करणनं त्यांना या चित्रपटात घेतलं. कारण त्यांना माहित आहे की ते मॅजिक आणणार आणि माझ्या वडिलांनी काही क्षणातच कमाल केली.'