मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहन चालकांना लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. मराठी अभिनेता योगेश सोहोनीला 50 हजारांना लुटले आहे. 'तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर सव्वा लाख रुपये दे', अशी मागणी करत एका कार चालकाने मराठी अभिनेता योगेश सोहोनी याला एटीएममधूनज जबरदस्ती 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटणे एक्झिटजवळ घडलीये. अभिनेता योगेश याने शिरगावं परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका स्कॉर्पिओ कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी कलाकार योगेश सोहोनी त्यांच्या कार मधून मुंबईहून पुण्याला येत होते. सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास सोमाटणे एक्झिटजवळ एका पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. स्कॉर्पिओ चालकाने सोहोनी यांना हात दखाबून थांबण्यास सांगितले. त्यामुळे सोहोनी यांनी कार थांबवली.



स्कॉर्पिओ मधून एक व्यक्ती उतरला आणि सोहोनी यांच्याकडे आला. आरोपीने सोहोनी यांना धमकी देऊन पैशांची मागणी केली. सोमाटणे फाटा येथील एटीएम जवळ नेऊन सोहोनी यांना 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडले. सोहोनी यांनी एटीएममधून पैसे काढले असता ते पैसे जबरदस्तीने घेऊन आरोपी स्कॉर्पिओ चालक पळून गेला. परंदवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.