मुंबई : मराठी सिनेसृष्टीत लग्नासमारंभांची रेलचेल सुरू झाली आहे. प्रार्थना आणि सानिका पाठोपाठ आता हा अभिनेता अडकला विवाह बंधनात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्याने गुपचूप लग्न केल्याची माहिती मिळाली आहे. 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या म्हणजे रोहन गुजरने गुपचूप २१ नोव्हेंबरला लग्न केलं आहे. रोहनने 'होणार..' मध्ये जान्हवीच्या म्हणजे तेजश्री प्रधानच्या भावाची भूमिका साकारली. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. 


तसेच तो सध्या 'वर खाली दोन पाय' या नाटकात काम करत आहे. त्याच्या या नाटकाची चांगलीच चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत रोहनने छोट्या पडद्यावर त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे मराठी सिनेमांतही त्याने काम केले आहे. 



रोहनने नुकतेच त्याची प्रेयसी स्नेहल देशमुख सोबत गुपचूप लग्न केले आहे. त्यानेच ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना दिली आहे. त्याने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत आम्ही अतिशय साधेपणाने लग्न केले असे लिहिले आहे. त्याचसोबत एका देवळात आई-बाबा, बहिण-भाऊ आणि देवा ब्राम्हणांच्या साक्षीने लग्न केले असे देखील त्याने त्याच्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. 


रोहनने त्याची मैत्रीण स्नेहल देशमुखसोबत जून महिन्यात साखरपुडा केला होता. रोहन आणि स्नेहल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत. गेल्या १४ वर्षांपासून ते एकमेकांचे फ्रेंड्स असल्याचे रोहननेच साखरपुड्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितले होते. त्याने साखरपुड्याच्या समारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याचसोबत १४ वर्षांची मैत्री... आणि आता डायल टोन... इन्गेंज्ड असे लिहिले होते.