Salman Khan: 'हम आपके हैं कौन' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच चित्रपटातील दीदी तेरा देवर दीवाना, पहला-पहला प्यार है आणि मौसम का जादू या गाण्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या या चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. 5 ऑगस्ट 1994 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडो रुपयांचा गल्ला जमवला होता. अशातच आता निर्मात्यांनी पुन्हा एकदा 'हम आपके हैं कौन' चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. 


चित्रपट कधी आणि कुठे पाहायला मिळणार?


नुकतीच 'हम आपके हैं कौन' चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे प्रोडक्शन हाउस राजश्री फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 'हम आपके हैं कौन' पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट 9 ऑगस्टपासून निवडक सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 



काय आहे कारण? 


 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट खूपच हिट ठरला आहे. 30 वर्षांचा प्रवास साजरे करण्यासाठी  'हम आपके हैं कौन' हा चित्रपट पुन्हा एकदा निवडक सिनेमागृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय जुन्या प्रेक्षकांसाठी घेतला आहे. नवीन पिढीच्या प्रेक्षकांसाठी ही चित्रपटाचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी असणार आहे.