मुंबई : बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा लव्ह स्टोरीचा उल्लेख केला जातो तेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं नाव नक्कीच येतं. 1999 मध्ये प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या सेटवर हे दोघे एकमेकांच्या जवळ आले होते आणि इथूनच सलमान-ऐश्वर्याच्या लवस्टोरीला सुरूवात झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1997 पर्यंत बॉलीवूडमध्ये सलमान खान एक मोठं नाव बनलं होतं आणि ऐश्वर्या राय चित्रपटसृष्टीत आपला पाया प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होती. त्याचवेळी सलमानसुद्धा अभिनेत्री सोमी अलीशी असलेल्या त्याच्या संबंधांबद्दल चर्चेत होता. मीडिया रिपोर्टनुसार सलमानलाही सोमीसोबत लग्न करायचं होतं, मात्र नशिबाला देखील हे नातं मंजूर न्हवतं


सलमान जेव्हा ऐश्वर्याला भेटला तेव्हापासूनच तो तिचा बनून गेला होता. 'हम दिल दे चुके सनम' सिनेमाच्या सेटवर सलमानबरोबरच ऐश्वर्यादेखील सलमानच्या प्रेमात पडली होती. मात्र हे नातं ऐश्वर्याच्या घरातील मंडळींना आवडत नव्हते, परंतु म्हणतात ना, प्रेमात तिसर्‍या व्यक्तीचा आवाज कुठे चालतो. ऐश्वर्याच्या बाबतीतही काहिसं असंच घडलं आणि ऐश्वर्याने तिच्या आई-वडिलांचं घर सोडलं आणि ती स्वतंत्र राहू लागली.


काही काळ सर्व काही ठीक होतं पण सलमानच्या अति रागाने सर्व काही उध्वस्त झालं. एका रिपोर्टनुसार, एके रात्री सलमान खान ऐश्वर्या रायच्या घरी आला आणि जोरात दार वाजवू लागला. हे सगळं पहाटे 3 वाजेपर्यंत चालू होतं. आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्यानुसार सलमानला हातातून दरवाजा वाजवून वाजवून रक्त वाहू लागलं होतं.


एका रिपोर्ट्सनुसार सलमानला ऐश्वर्याबरोबर लग्न करायचं होतं पण ऐश्वर्याला त्या वेळी तिच्या करियरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. सलमान खानच्या या गोंधळामुळे ऐश्वर्याच्या वडिलांनीही त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती आणि ईथूनच या दोघांची प्रेमकथा कायमची संपली.