मुंबई : अभिनेता सलमान खान याची मुख्य भूमिका असणारा 'दबंग' हा चित्रपट आणि आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले चित्रपटाचे दोन्ही भाग अनेकांसाठीच खास आहेत. अशा या लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या चित्रपटाचा तिसरा भागही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ट्रेलर मागोमाग सलमानच्या 'दबंग ३' या आगामी चित्रपटातील गाणीही प्रदर्शित करण्यात येत आहेत. त्यातच सध्या गाजत आहे तो म्हणजे 'मै हूँ दबंग दबंग' या गाण्याचा एक व्हिडिओ. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर 'हुड हुड दबंग'च्या या नव्या व्हर्जनचा अंदाज पाहता भाईजान सलमान एका नव्या आणि तितक्याच हटके रुपात दिसत आहे. यामध्ये तो गाण्यावर अनोख्या अंदाजात ठेका धरतानाही दिसत आहे. 'चुलबूल पांडे'चा हा लूक आणि त्याची नृत्याची स्टाईल अनेकांच्या मनात चित्रपटासाठीची उत्सुकता जागवून जात आहे.




'मै हूँ दबंग' या गाण्याचं चित्रीकरण महेश्वर येथे असणाऱ्या अहिल्या किल्ल्याजवळ करण्यात आलं आहे. जवळपास ५००हून अधिक कलाकारांचा या गाण्यात सहभाग आहे. साजिद- वाजिद या संगीतकार जोडीने गाण्यालं दमदार संगीत दिलं आहे. सलमानचा डॅशिंग अंदाज, अर्थातच दबंगला साजेसे काही स्टंट आणि कलाकारांची मेहनत पाहता भाईजानचा हा चित्रपट आता बॉक्स ऑफिस कमाईत कुठवर मजल मारतो हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल.