मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसचं आहे. सलमानचा त्याची भाची आयतसोबत असलेला एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान आयतसोबत खेळताना दिसत आहे. भाची प्रती असणारं सलमानचं हे प्रेम खुप काही सांगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द सलमानने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास ३४ लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिला आहे. आयत ही सलमानची लाडकी बहिण अर्पिताची मुलगी आहे. सलमानच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तिने आयतला जन्म दिला. 



व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आयत कोणाच्यातरी हतात आहे आणि सलमान तिच्यासोबत खेळताना दिसत आहे. सोशल मीडियावर आयतसोबत सलमानचा हा पहिलाचं व्हिडिओ असल्यामुळे चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. 


सलमान सध्या त्याच्या आगामी 'राधे' चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. २००९ साली आलेल्या 'वॉन्टेड' चित्रपटाचा 'राधे' सिक्वल आहे. परंतू कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचं शूटींग थांबण्यात आलं आहे.