मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचलेला अभिनेता कायमच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. आपल्या अभिनयाने खळखळून हसवणारा समीर चौघुले आता नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमाद्वारे दीड तास धमाल किस्से, गप्पा मनोरंजन होणार आहे. यासंदर्भात नुकतीच समीर चौघुलेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक पोस्ट शेअर करत समिरने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ''सम्या सम्या मैफिलीत माझ्या'' ...समीर चौघुले '' …….प्रेम हे ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं असत, जे संधीच सोनं करतात त्याना संसाराची विंडोसीट मिळते.. तर काही जणांच्या मते प्रेम हे प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे नेहेमी पायदळी तुडवलं जातं....तर काही जणांच्या मते खरं प्रेम म्हणजे “एखाद जुनं पुस्तक चाळताना सापडलेलं मोराचं पीस”...लग्न म्हणजे काय यावर कोणीतरी म्हटलंय “साबणाची संपत आलेली जुनी वडी नव्या कोऱ्या साबणाला चिकटवणे आणि साबण मोठा करून पुढील अंघोळ करणे”...काही जणांच्या मते लग्न म्हणजे “मुंडावळ्या बांधून वाजत गाजत संसाराच्या बाईकवर बसून ‘मौत का कुव्वा’ मध्ये उडी मारणे” .....वगैरे वगैरे....‘प्रेम’ आणि ‘लग्न’ यांच्या जगभरात वगवेगळ्या व्याख्या आहेत.... रसिक हो...यातली नेमकी तुमची व्याख्या कोणती? सांगता येईल?...चला जाणून घेऊया.... आयुष्यात सुखी होण्यासाठी गुदगुल्या करणाऱ्या, मजेशीर, हास्य कल्लोळ उसळवणाऱ्या महत्वाच्या टिप्स घेऊन येतायत सदाबहार युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध अभिनेता लेखक समीर चौघुले..एक नवा कोराकरकरीत एकपात्री कथा कथनाचा कार्यक्रम घेऊन “सम्या सम्या मैफिलीत माझ्या”.........हसतखेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणाऱ्या धम्माल विनोदांची भेळ म्हणजेचं........ “सम्या सम्या मैफिलीत माझ्या”....सम्याच्या मैफिलीत तुमचं स्वागत आहे...



सध्या समीरची ही पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतंय. अनेकांनी अभिनेत्याच्या या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलंय की, देव करो आणि ह्याचे प्रयोग जगभर हॉऊसफूल होवोत दादा. तर अजून एकाने लिहीलंय, ह दादा! अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा. तर अजून एकाने लिहीलंय, मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप खूप शुभेच्छा. अप्रतिम कार्यक्रम असणार हा. उत्तम संहिता आणि अप्रतिम सादरीकरण बघायला मिळणार. धन्यवाद. तर अनेक कलाकारांनीदेखील या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.