Shah Rukh Khan : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. शाहरुखने गेल्या वर्षी बॅक टू बॅक दोन 1000-1000 कोटींचे हिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खानने 4 वर्षांनंतर 'पठाण' या चित्रपटातून पुनरागमन केले होते. त्यावेळी त्याच्या या चित्रपटावर पैशांचा पाऊस पडला होता. यातून पैज लावणारे निर्माते देखील श्रीमंत झाले. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणची जोडी ही सिनेसृष्टीतील सर्वात हिट जोडी ठरली होती. 2023 मध्ये शाहरुख खानचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले होते. ज्यामध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता चाहते शाहरुख खानच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या शाहरुख खान अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत असल्याचं देखील म्हटलं जात होतं. मात्र, यावर्षी तो एकही चित्रपट प्रदर्शित करत नसल्याची माहिती मिळत आहे. शाहरुख खान मुलगी सुहाना खानसोबत 'किंग' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटावर त्याने पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. 


'किंग' चित्रपटाचं शुटिंग 2025 मध्ये सुरु होणार


अभिनेता शाहरुख खान 'किंग' चित्रपटातून पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि सुहाना खान जानेवारी 2025 मध्ये 'किंग' चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि अॅक्शन सीन सुधारण्यासाठी सुजॉय आणि सिड एकत्र काम करत आहेत. त्यामुळे अभिनेता शाहरुखने 'किंग' साठी पुन्हा एकदा ब्रेक घेतला आहे. आता हा चित्रपट 2024 आणि 2025 मध्ये प्रदर्शित होणार नाही. 2026 मध्ये शाहरुख पुन्हा एकदा 'किंग' चित्रपटातून कमबॅक करणार आहे. 



 'किंग' नंतर 'पठाण 2' वर काम सुरु करणार


रिपोर्टनुसार, 'किंग' हा चित्रपट दोन पात्रांचा असणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि सुहाना खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. शाहरुख खानकडे 'पठाण 2' देखील आहे. 'किंग' चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर तो 'पठाण 2' चित्रपटावर काम सुरु करु शकतो.