`या` हिंदी क्लासिक सिनेमात ऐश्वर्या राय तिच्याहून लहान अभिनेत्यासोबत करणार रोमांस
पद्मावत चित्रपटातील दमदार कामगिरीनंतर आता शाहीद कपूर लवकरच नव्या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
मुंबई : पद्मावत चित्रपटातील दमदार कामगिरीनंतर आता शाहीद कपूर लवकरच नव्या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
नव्या क्लासिक हिंदी चित्रपटामध्ये शाहीद कपूर प्रमुख भूमिकेत आहे. सोबत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन झळकणार आहे. शाहीद कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन हे दोघेही या चित्रपटामध्ये काम करणार का ? याबाबत बोलणं सुरू आहे.
शाहीद आणि ऐश्वर्या कामात व्यग्र
ऐश्वर्या राय बच्चन इतर काही प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. तर शाहीद कपूर सध्या 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटामध्ये व्यस्त आहे.
'वो कौन थी'चा रिमेक
1964 सालच्या मनोज कुमार यांच्या 'वो कौन थी' या बॉलिवूड क्लासिक चित्रपटाचा रिमेक होणार आहे. या चित्रपटाची कहाणी, गाणी खूपच लोकप्रिय होती. सुमारे 50 वर्षांनंतर या चित्रपटाचा रिमेक होणार आहे. मनोज कुमार यांच्या जागी शाहीद कपूर आणि साधना यांची जागी ऐश्वर्या राय बच्चन यांचं नाव चर्चेत आहे.
सायकोलॉजिकल मिस्ट्री
1964 साली आलेल्या 'वो कौन थी' हा सिनेमा रहस्यपट आहे. राज खोसला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ऐश्वर्या आणि शाहीद कपूर दिसणार का? याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.