Shantanu Moghe Leg Fracture: कलाकारांचे आयुष्य हे कधीच सरळं नसतं. त्यांच्या आयुष्यात (Shantanu Moghe News) अनेक चढउतार हे असतातच. त्यातून स्टेजवर काम करताना अनेक अडथळे त्यांना पार करावे लागतात, अशावेळी मग कुठेलही शारिरीक व्यंग असो नाहीतर इतर त्रास प्रत्येक अडचणींना सामोरे जात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते आपल्या समोर आलेल्या कठीण प्रसंगांना तोंड देतात. त्यामुळे त्यांच्या जिद्दीला दाद द्यावी तेवढीच कमी. अशा एक हरहुन्नरी अभिनेत्यानं पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही स्टेजवर उभं राहून नाटकं सादर केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे त्याच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. शंतनू मोघे यानं 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मालिकेत साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमिका विशेष गाजली होती. (actor shantanu moghe performs live on stage while having a leg injury wife priya marathe praises her)


अभिनेता शंतनू मोघे याची पत्नी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe On Shantanu Moghe) हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं याविषयी स्पष्ट केले आहे. ही इमोशनल पोस्ट सध्या सगळीकडे व्हायरल होते आहे. या पोस्टखाली अभिनेते अमोल कोल्हे यांनी कमेंट करत तू लवकर बर हो असं म्हटलं आहे तर अभिनेता अभिजित खांडकेकरही खरंच कौतुकास्पद अशी कमेंट केली आहे. 


नक्की काय घडलं? 


अभिनेता शंतनू मोघे सध्या 'सफरचंद' (Safarchand) या नाटकात काम करतो आहे. यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाल्यानं त्यानं हातात वॉकर घेऊन संपुर्ण नाटकाचा प्रयोग केला. या आपल्या पतीच्या कर्तृत्वानं अभिमान वाटणाऱ्या आपल्या पत्नीनं प्रिया मराठेनं इन्टाग्रामवर एक खास पोस्ट (Priya Marathe Instagram Post) चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यावेळी त्या दोघांचे भरभरून कौतुक करण्यात आले आहे. 


पोस्टमध्ये प्रियानं काय म्हटलं आहे? 


“रिअल हिरो!
Hatts off वगैरे अलंकार फार छोटे वाटत आहेत.
हे तूच करू जाणे..
तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम!
ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते.. पाय फ्रॅक्चर झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनू नी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे..
कमाल! आता तुला हडाचा कलाकार म्हणता येईल”



अभिनेता शंतनू मोघे हा ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे (Shrikant Moghe Son) यांचा मुलगा आहे. काही महिन्यांपुर्वी श्रीकांत मोघे यांचे निधन झाले होते. शंतनू मोघे यांनं अनेक मराठी मालिका नाटक आणि चित्रपटांमधून कामं केली आहेत. परंतु त्याची 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyrakshak Sambhaji) या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची भुमिका विशेष गाजली होती.