मुंबई : भोजपुरी सिनेमातील लोकप्रिय अभिनेता पवन सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. या व्हिडिओमुळे अभिनेता पवन सिंह यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोकांनी त्यांचा सिनेमा आणि म्युझिक अल्बम मोठ्या प्रमाणात पसंत केले आहेत. पवन सिंह यांना त्यांच्या 'लॉलीपॉप लागेलु' या गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली आहे. हे गाणं इतके हिट झालं की प्रेक्षक इतक्या वर्षानंतरही त्याच्या या गाण्याची मागणी करतात. 


गेल्यावर्षीचा हा व्हिडिओ पाहा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवन सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लंडनमधील असून पवन सिंह लंडनच्या रस्त्यावर गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ गेल्यावर्षीचा असून पवन सिंहसोबत निरहुआ दिनेशन लाल यादव आणि अक्षरा सिंह दिसत आहे. हा व्हिडिओ लंडनच्या चाहत्यांसोबतचा आहे. ज्यांनी भर रस्त्यान पवन सिंह यांना 'लॉलीपॉप लागेलु' हे गाणं गायलं लावलं आहे. 



21 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला हा व्हिडिओ 


हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर Pawan Singh Officical या पेजवर गेल्यावर्षी अपलोड केला आहे. 5 नोव्हेंबर 2017 ला अपलोड केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2,145,384  एवढया लोकांनी पाहिला आहे.  काही दिवसांपूर्वीच पवन सिंह आणि ज्योती सिंहने लग्न केलं असून पहिल्या पत्नीने आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्याने दुसरं लग्न फार उशीराने केली. 


'वाँटेड' मध्ये दिसणार पवन सिंह 


पवन सिंह हे मूळतः बिहारमधील आरा येथे राहणारे आहे. त्यांनी भोजपुर सिनेमा आणि शेकडो अल्बममध्ये काम केलं आहे. पवन सिंहने गायक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली आहे. पहिला अल्बम 1997 मध्ये दिसला होता.