मुंबई : बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी आता मराठी सिनेमांकडे वळत आहेत. असाच आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मराठी 'चुंबक' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संदीप मोदी दिग्दर्शित या चुंबक सिनेमात आणखी एक खास बात म्हणजे या सिनेमातून गीतकार, गायक स्वानंद किरकिरे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. हा सिनेमा 27 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुंबक या सिनेमातून पुणे येथील साहिल जाधव आणि कोल्हापूर येथील संग्राम देसाई मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी तसेच ‘हापूस’, ‘ताऱ्यांचे बेट’ आणि ‘हृदयांतर’ फेम सौरभ भावे त्याचप्रमाणे सिनेमाचे निर्माते नरेन कुमार आहेत. 



चुंबकबद्दल काय म्हणाला अक्षय कुमार?


 अक्षय कुमारने या सिनेमाबद्दल बोलताना म्हटले आहे की, तुम्ही आयुष्यात ज्या निवडी करता त्यांबद्दल हा चित्रपट भाष्य करतो. “तुम्ही आधी तुमच्या आयुष्यातील निवड घडवता आणि नंतर निवड तुम्हाला घडवते,” तो म्हणतो. ‘चुंबक’ची प्रस्तुती करण्याची निवड अक्षय कुमार यांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर घेतला. या सिनेमाबद्दल आणि त्याच्या कथेबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, हा चित्रपट प्रत्येक कुटुंबाने एकत्र बसून पाहिला पाहिजे, असा आहे. “हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात पहिली कोणती भावना आली असेल तर ती म्हणजे हा चित्रपट मी माझ्या मुलांबरोबर पहिला पाहिजे. याची कथा जीवनातील मूल्यांचे महत्व तुम्हाला पटवून देते. आज आपल्या आयुष्यात मूल्यांचे महत्व कमी होत असताना चित्रपट तुम्हाला ही मुल्ये आणि इतर भौतिक गोष्टी यामंधील फरक उलगडून सांगतो. चांगले काय आणि वाईट काय, हे शिकवतो आणि त्यातून कशाची निवड करायची हे अधोरेखित करतो. म्हणूनच प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना दाखवावा असा हा चित्रपट आहे,” तो म्हणतो.