मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सुदने लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील मजदुरांना आपल्या घरी सोडण्याचं मोठं कार्य केलं. सिने इंडस्ट्रीत सोनू सुद प्रमाणे समाज कार्य करणारा सध्या कोणता कलाकार नाहीय. सोनूचं हे सत्कार्य केवळ लॉकडाऊनपुरतं मर्यादीत नव्हतं हे आता पुन्हा स्पष्ट झालायं. सोनुने पुन्हा एकदा अशी मदत केलीय जे ऐकून त्याच्या चाहत्यांची छाती अभिमानाने फुलून येईल. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन काळात ट्वीटरवर सोनुकडे मदतीची याचना होत असे. सोनू देखील त्यावर पत्ता आणि मोबाईल नंबर मागवत मजुरांना गावी जाण्यास सहकार्य करत होता. दरम्यान आणखी एका ट्वीटमध्ये सोनुकडे मदत मागितली गेली. एक बेघर महिला आपल्या दोन मुलांना घेऊन फुटपाथवर झोपलेली असतानाचा फोटो युजरने ट्वीटरवर शेअर केला. सरकारकडून अपेक्षा नाही सोनुने मदत करावी असे त्याने म्हटले. सोनुने देखील त्या ट्वीटला तात्काळ रिप्लाय केला. उद्या रात्रीपर्यंत या मुलांच्या डोक्यावर छत असेल असा रिप्लाय सोनुने देऊन टाकला. मग काय ? सोनुच्या फॅन्सनी ते ट्वीट अनेकदा रिट्वीट केलं. 


त्या महिलेचा परिवार पटनामध्ये राहत होता. पतीचा मृत्यू झाल्यानंतर घरमालकाने या परिवाराला घराबाहेर काढलं. त्यानंतर आपल्या भुकेलेल्या मुलांना घेऊन ती फुटपाथवर राहू लागली. अशी माहिती फोटोसोबत एका युजरने दिली. त्याला सोनुने उत्तर देत या चिमुरड्यांच्या डोक्यावर छत नक्की असेल असे उत्तर दिले. 


दुसरीकडे लॉकडाऊन काळात सोनुच्या मदतीने केरळहून ओडीसाला जाऊ शकलेल्या मजुराने वेल्डींगचं दुकान टाकलंय.



त्याला सोनू सूद वेल्डींग वर्कशॉप असं नाव दिलंय. याचे फोटो देखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतायत.