गुरुदासपुर : भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि अभिनेता सनी देओल यांच्या गाडीला अपघात झाला आहे. निवडणुक प्रचारासाठी निघालेल्या सनी देओल यांच्या ताफ्यातील गाड्यांची एकमेकांना ठोकर झाली. चुकीच्या दिशेने जाणारी एक सेन्ट्रो कार सनी देओलच्या ताफ्याला धडकली. सनी देओल यांच्या रेंज रोवरसह इतर ४ गाड्यांची ठोकर झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. पठाणकोट-अमृतसर महामार्गावरील सोहल गावाजवळ हा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी अभिनेता धर्मेंद्र यांनी शनिवारी गुरुदासपुर येथे लोकसभा निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या सनी देओल यांच्यासाठी प्रचार केला होता. यावेळी मीडियाशी बोलताना धर्मेंद्र यांनी या भागात जनतेचे दुख:, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले असल्याचं सांगितलं. 



या भागात काँग्रेसकडून सुनिल जाखड निवडणूक रिंगणात उभे आहेत. सुनिल यांना राजकारणातील अनुभव आहे. त्यांचे वडीलही राजकारणात होते. आम्ही कलाविश्वातून आलो आहोत. आम्हाला कोणतंही भांडण करायचं नाही. आम्ही इथे लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी प्रचारसभेदरम्यान म्हटलं होतं.