सहा महिन्यांपूर्वीच सुशांत राहायला आला होता वांद्य्रात; घराचे भाडे ऐकून व्हाल थक्क
पोलिसांना घरात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही.
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी वांद्रे येथील आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे एक पथक त्याच्या घरी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांना कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. त्यामुळे तुर्तास सुशांतने नैराश्याच्या भरात आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुशांत सिंह राजपूत नोव्हेंबर महिन्यात करणार होता लग्न
सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत सहा महिन्यांपूर्वीच वांद्रे येथे राहायला आला होता. सुशांतने येथील घर भाड्याने घेतले होते. या घराचे महिन्याचे भाडे साधारण ४.५५ लाख इतके होते. २०१५मध्ये सुशांतने पाली हिल येथे एक पेंट हाऊसही खरेदी केले होते. साधारण २० कोटी रुपयांना त्याने हे पेंटहाऊस विकत घेतले होते. मात्र, तरीही सुशांत सध्या भाड्याच्या घरात राहत होता.
Sushant Singh Rajput’s Property: सुशांत राजपूतने चंद्रावर खरेदी केला होता प्लॉट
गेल्या काही दिवसांपासून सुशांत नैराश्यामध्ये असल्याचे म्हटले जाते. त्याची हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरु होती. गेल्या तीन दिवसांपासून सुशांतला बरे नसल्याचे त्याच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. दरम्यान, सुशांतचा मृतदेह सध्या वांद्रे येथील कूपर रुग्णालयात आहे. याठिकाणी त्याच्या मृतदेहाची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला होता. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.