दिशा पटानीचा `Pink Bikini` लूक पाहून `टायगर` घायाळ, म्हणाला....
दिशाचा हा लूक पाहून चाहत्यांप्रमाणंच टायगरही....
मुंबई : अभिनेत्री (Disha Patani ) दिशा पटानी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायमच अनेक फोटो चाहत्यांच्या भेटीला आणत असते. कमनीय बांधा आणि मादक अदा हे दिशाच्या सौंदर्याला जणू चार चाँद लावतात. सध्याही बी टाऊनची ही सौंदर्यवती तिच्या अशाच एका लूकमुळे प्रकाशझोतात आहे.
गुलाबी रंगाच्या बिकीनीमध्ये (Bikini) दिशानं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती सनबाथ घेताना अर्थात सूर्यकिरणांमध्ये बसलेली दिसत आहे. दिशाचा हा फोटो आणि तिच्या अदा पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकत आहे. अगदी अभिनेता आणि दिशाचा कथित प्रियकर टायगर श्रॉफही यातून वाचू शकलेला नाही.
समुद्रकिनारी सनबाथ घेणाऱ्या दिशाचं सौंदर्य पाहून टायगरही त्यावर प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही. मोकळे केस, गुलाबी रंगाची बिकीनी आणि डोक्यावर हॅट असं दिशाचं सौंदर्य पाहून त्यानं, 'हॉट' असं लिहित फोटोवर कमेंट केली. सोबतच त्यानं आगीचे इमोजीही जोडले.
शाच्या फोटोवर टायगरनं केलेली ही कमेंट पाहता पुन्हा एकदा या सेलिब्रिटी जोडीच्या केमिस्ट्रीनं चाहत्यांचं लक्ष वेधलं. दिशा आणि टायगर मागील बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरीही, या दोघांपैकी कोणीही त्यांच्या या नात्याची अधिकृत ग्वाही दिलेली नाही. पण, ही प्रेमकहाणी कोणापासूनही लपलेली नाही हेसुद्धा तितकंच खरं.