कंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात?
Kangana Ranaut Slaped by CISF Officer at Airport : कंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात? नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या...
Kangana Ranaut Slaped by CISF Officer at Airport : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतला चंडीगढ विमानतळावर एका CISF जवाननं कथित कानशिलात लगावली आहे. या CISF जवानचं नाव कुलविंदर कौर असं आहे. तर कंगनानं पोलिसांकडे तक्रार केल्याचे देखील म्हटलं जातं आहे. तर कंगनानं तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कंगना रणौतच्या राजकीय सल्लागारानुसार, CISF महिला रक्षकानं चंदीगड विमानतळाच्या आत कंगना राणौतला कानशिलात मारली. सीआयएसएफ रक्षकांना हटवून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी कंगनानं केली आहे. कंगना राणौत शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधात बोलल्यानं CISF गार्ड रागावल्या होता, असा दावा केला जात आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्या सगळ्या घटनेनंतरचा असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओत कंगना ही विमानतळाव असून तिला पुढे तिच्या गेटकडे जात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. तर त्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक व्यक्ती कंगनासोबत असलेल्या एका महिलेच्या चापट मारताना दिसत आहे.
दरम्यान, कंगनाच्या राजकीय प्रवासाविषयी बोलायचे झाले तर ती नेहमीच भाजप सरकारला पाठिंबा देताना दिसली. तर लोकसभा निवडणूक 2024 साठी ती हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून भाजप पक्षाकडून निवडणूक लढली. जेव्हा कंगनाला इथून भाजपचं तिकिट मिळालं त्यानंतर ती प्रचारासाठी खूप मेहनत घेतना दिसली. तिनं 74, 755 मतानं विजय मिळवला असून तिच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली आहे. कंगनाच्या विरोधात या सीटसाठी कॉंग्रेसचे विक्रमादित्य सिंग लढत होते. इतकंच नाही तर बहुमतानं ती यावेळ निवडणूक जिंकली देखील आहे. त्यानंतर कंगनानं सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सगळ्या लोकांचे तिच्यावर विश्वास ठेवल्यानं आभार मानले आहे. त्यानंतर आज तिनं फोटो शेअर करत ती संसदेत जात असल्याचं देखील तिनं पुढे सांगितलं.