मुंबई  : वरुण धवनचा ड्रायव्हर मनोज साहू यांनी शेवटच्या वेळेपर्यंत काम केलं. वरुणला शूटवर सोडून बाहेर त्यांची वाट पाहत संध्याकाळ काढणारे मनोज यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वरुणच्या ड्रायव्हरचे अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

26 वर्षे एकत्र राहिल्यानंतर अशाप्रकारे त्याचा सहकारी त्याला सोडून जाईल याची त्याने कल्पना देखील केली नसेल. मनोज साहू यांच्या निधनानंतर अभिनेता वरुण धवनने एक भावनिक पोस्ट शेअर करून शेवटची गोष्ट सांगितली आहे.


वरुण धवनने त्याच्या सोशल मीडिया पेजवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या ड्रायव्हरला आदर दिला आहे, ज्यामुळे सर्वांचे डोळे ओले झाले आहेत.


व्हिडिओमध्ये वरुण म्हणत आहे की, माझ्या चांगल्या आणि वाईट काळात माझ्यासोबत असलेली व्यक्ती म्हणजे माझा ड्रायव्हर मनोज साहू. अनेक वर्षांपासून तो नेहमीच माझ्यासोबत असतो. एवढं बोलून त्यांनी मनोजला स्टेजवर बोलावलं आणि मिठी मारली आणि म्हणाले- तो माझा सर्वस्व आहे, त्याने माझा संपूर्ण प्रवास पाहिला आहे. कसं वाटतंय मनोज, ज्याला उत्तर देताना मनोज खूप खुश दिसत होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडिओसोबत वरुणने कॅप्शनमध्ये लिहिले - मनोज माझ्या आयुष्यात गेल्या 26 वर्षांपासून होता. तो माझे सर्वस्व होता. माझे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, पण लोकांनी त्याच्या शहाणपणाबद्दल आणि जीवनाबद्दलच्या त्याच्या उत्कटतेबद्दल त्याचे स्मरण करावे अशी माझी इच्छा आहे. मनोज दादा मी तुमचा सदैव ऋणी राहीन...