मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी 9 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये लग्न गाठ बांधली. दोघांनी अगदी शाही पद्धतीने विवाह केलं. लग्नाबाबतची कोणतीही माहिती त्यांनी अधिकृत रित्या चाहत्यांना दिली नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना विकीपेक्षा अनेक गोष्टीत अव्वल आहे. अगदी इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलायचं झालं तर कतरिनाने विकीला मागे टाकलं आहे. विकीला इंस्टाग्रामवर 11.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर कतरिनाला 59 मिलियन फॉलोअर्स आहेत. 


आता सगळ्यांनाच आपल्या दमदार अभिनयाने आणि स्टाईलने आपल्या प्रेमात पडणारी कतरिनाने आता विकीचं ही मनं जिंकलं आहे. लग्नानंतर कतरिनाने विकीसाठी खास डिश तयार केली आहे. 



नुकतेच कतरिना आणि विकी मुंबईत परतले आहे, आणि दोघेही त्यांच्या नव्या घरी राहत असल्याचं बोललं जात आहे. दोघांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली आहे. लग्नानंतर कतरिना कैफने आपल्या सोशल मीडियावरील आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नातील खास फोटो शेअर केला आहे. 


यासोबतच कतरिनाने विकी कौशलच्या घरी पहिला पदार्थ बनवला आहे. याचा फोटो देखील तिने शेअर केलाय. विकीच्या घरी पहिला पदार्थ कतरिनाने बनवला, तो म्हणजे गोड  शिरा... 



खास विकीसाठी बनवलेल्या या पदार्थाचं त्याने तोंड भरुन कौतुक केलं आहे. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर शिऱ्याच्या प्लेटचा फोटो शेअर करत पत्नीचं कौतुक केल आहे.


(लग्नानंतर कतरिनाने विकीसाठी बनवली स्पेशल डिश)


कतरिनाने बनवलेला पदार्थ खात असताना त्यांना हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केलायं. 



कतरिनाने आपल्या इंस्टाग्राम स्टेटसवर 'Maine Banaya'असं म्हणत शिऱ्याचा फोटो शेअर केलाय. तर याला उत्तर देत विकीने 'best halwa ever' असं म्हटलं आहे.