Thalapathy 69: तमिळ अभिनेता थलापती विजय लवकरच फिल्मी करिअर सोडून राजकारणात प्रवेश करणार आहे. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम उर्फ GOAT हा त्याचा शेवटचा चित्रपट असेल असे मानले जात आहे. पण तसे झाले नाही. त्याचा शेवटचा चित्रपट 'थलापती 69' आहे.  KVN प्रॉडक्शनने आज याची घोषणा केली आहे. विजयने आणखी एक चित्रपट साइन केला आहे. या बातमीनंतर चाहते देखील प्रचंड उत्सुक झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'थलापती 69' विजयचा शेवटचा चित्रपट


KVN प्रॉडक्शनने त्याच्या सोशल मीडियावर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, आम्ही सर्वजण तुमच्या चित्रपटांसह मोठे झालो आहोत. प्रत्येक टप्प्यावर तुम्ही आमच्या जीवनाचा एक भाग आहात. 30 वर्षांहून अधिक काळ आमचे मनोरंजन केल्याबद्दल 'थलापती'  धन्यवाद. #Thalapathy69 प्रकल्पाची घोषणा उद्या संध्याकाळी 5 वाजता केली जाईल. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विजयची फिल्मी कारकीर्द आणि राजकारण


विजयने 1992 मध्ये आलेल्या 'नालाइया थीरपु' या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं आहे. तो तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार बनला. या वर्षांमध्ये त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  तो अलीकडेच वेंकट प्रभुच्या  'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम उर्फ GOAT या चित्रपटात दिसला होता. जो 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.


विजयच्या पक्षाचे नाव काय? 


'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम उर्फ GOAT हा विजयचा शेवटचा चित्रपट असेल का असे अनेकांना वाटले. परंतु राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी अभिनेत्याने आणखी एक चित्रपट साइन करण्यास सहमती दर्शवली आहे. या वर्षी फ्रेब्रुवारीमध्ये विजयने आपला राजकीय पक्ष 'तमिलगा वेत्री कळघम' सुरु करण्याची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने या वर्षी सप्टेंबरमध्ये पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणी केली आहे. 


'GOAT'ची पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई


थलापती विजयचा 'GOAT' हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट आता भारतात 200 कोटींच्या आकड्याकडे वाटचाल करत आहे.