मुंबई: देशाला स्वतंत्र्य 2014 ला मिळालं या कंगना रनौतने केलेल्या वक्तव्याचं विक्रम गोखलेंनी समर्थन केलं होतं. त्यानंतर विक्रम गोखलेही वादाच्या भोवऱ्यात सापडले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भाजप शिवसेना यांनी एकत्र यावं असंही वक्तव्य केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'Sudo सेक्युलारिझमवर माझा कणभरही विश्वास नाही. जात पात धर्म या नीच घाणेरड्या गोष्टींनी आपला देश पोखरला आहे असं मी नेहमी म्हणतो. धर्मनिरपेक्षता जोपासण्याचं नाटक केलं आहे. धर्मनिरपेक्षता जोपासण्याचं नाटक करणाऱ्यांवर माझा कधी विश्वास बसलेला नाही बसणारही नाही. असं परखड मत यावेळी विक्रम गोखले यांनी मांडलं आहे. '


'राजकीय नेत्यांकडून ऑफर 30 वर्षापासून जे राजकीय नेते आहेत त्यांच्याकडून मला प्रस्ताव आलाय आमच्यात या मी गेलेलो नाही आत्ताच सांगतो. प्रत्येक राजकीय पक्षात काही चांगले लोक आहेत ज्यांच्यात चांगले गुण आहेत जे माझे 40 50 वर्षांपासून मित्र आहेत. कम्युनिस्ट लोकांबरोबरही मैत्रीचे संबंध आहेत.'


'देश भगवाच राहील हिरवा होणार नाही. या वक्तव्यावर मला जे काय स्पष्टीकरण द्यायचं ते मी आता दिल आहे. भाजप शिवसेना एकत्र यावे अशी माझी प्रामाणीक इच्छा आहे. दोनही पक्षांच्या चुका झाल्या आहेत. फार विचित्र कड्यावरती देश उभा आहे अशी माझी खात्री आहे.


'1962 सालचा भारत 2021 मध्ये राहिलेला नाही. आपल्याला माहीत आहे आणि शत्रूला ही माहीत आहे. शत्रूला खत पाणी पुरवणारे काही राजकीय नेते यांच्याबद्दल माझा संताप होतो आणि मी बोलणार म्हणून सेना भाजप एकत्र यायला पाहिजे.'


विक्रम गोखले यांनी केलेल्या या व्यक्तव्यानंतर आता पुन्हा नवा वाद सुरू होणार का? आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विक्रम गोखले यांच्या अडचणी वाढणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.