मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने तर सर्वत्र हाहाकार माजवला आहे. तर दुसरीकडे सेलिब्रिटींच्या निधनाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहे. बॉलिवूडच्या दिग्गज आभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री, लकी अली यांच्यानंतर  'रामायण' मालिकेत रावणाची भूमिका साकरण्याऱ्या अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाच्या अफवा पसरत आहेत. परंतु या अफवांना 'रामायण' मालिकेत 'लक्ष्मण' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेते सुनील लहरी यांनी पुर्णविराम दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील लहरी म्हणाले, 'सध्या सतत वाईट बातम्या कानावर येत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे. शिवाय  अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाच्या अफवा पसरत आहे. अशा अफवा पसरवण्यांनी कृपा करून असं करू नसे, देवाच्या कृपेने अरविंद त्रिवेदी यांची प्रकृती उत्तम आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो त्यांची प्रकृती अशीचं स्थिर राहावी.'



गेल्या वर्षी देखील त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या तेव्हा  अरविंद त्रिवेदी यांच्या पुतण्याने ट्विटरच्या माध्यमातून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये 'रामायण' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. मालिकेने पुन्हा चाहत्यांच्या मनात घर केलं. 


जुनी रामायण मालिका पुन्हा टीव्हीवर प्रसारित झाल्यामुळे मालिकेतील पात्र चर्चेत आले. 1987 ते 1988 पर्यंत 'रामायण' जगातील सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली. जून 2003 पर्यंत ही मालिका जगातील सर्वाधिक पाहिली गेलेली पौराणिक मालिका म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली होती.